अमृत दुर्गोत्सव 2025 मध्ये कु.उर्वशी वैभव मेहता यांचा सन्मान !

1004

महाराष्ट्र शासनाच्या “अमृत दुर्गोत्सव 2025” या उपक्रमांतर्गत ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येत आहे.
या विशेष उपक्रमात कु.उर्वशी वैभव मेहता यांना शासना मार्फत अभिनंदन पत्र प्राप्त झाले आहे.

शिवछत्रपतींच्या पराक्रमाशी निगडित १२ दुर्गांना “जागतिक वारसा स्थळ” म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या अभियानाला साथ देत, दुर्ग संवर्धन व जनजागृतीच्या कार्यात उर्वशी वैभव मेहता यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या या अभिनंदन पत्रात कु.उर्वशी मेहता यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

यावेळी “मी आणि माझा दुर्ग” या उपक्रमांतर्गत दुर्गविषयक जागरूकता वाढविण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

“चला दुर्ग बनवूया !” या घोषवाक्यासह महाराष्ट्राच्या दुर्ग वारसाचे जतन करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

गड़-किले-दुर्ग यांचे संवर्धन, हाच  “छत्रपती शिवाजी महाराज” यांना खरा मानाचा मुजरा आहे.

■□■