प्रभाग क्र. ६ मध्ये भाजपचा दणक्यात प्रचार, विद्याताई आत्रामांसह कमळाला प्रचंड मतांची खात्री..

125

● वणी नगरपरिषद निवडणूक ●

प्रभाग क्र.६ मध्ये भाजपचा दणक्यात प्रचार, विद्याताई आत्रामांसह कमळाला प्रचंड मतांची खात्री

▪︎बोदकुरवार, बोर्डे, चौधरी यांची घराघरांत धडक; “प्रभाग ६ चे दोन्ही कमळ जिंकले तर वणीचा विकास वेगवान होईल”


वणी, दि. १ डिसेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी):

उद्या होणाऱ्या वणी नगरपरिषद मतदानाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक ६ वर अक्षरशः धडक प्रचार केला. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्यासह या प्रभागातील दोन्ही जागांवरील भाजपचे अधिकृत उमेदवार सौ. धम्मदिना हरिष पाते (प्रभाग ६-अ, अनुसूचित जाती महिला) आणि श्री. विलास मारोतराव डवरे (प्रभाग ६-ब, सर्वसाधारण) यांना प्रचंड मतांच्या फरकाने विजयी करण्याचे ठाम आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हे तिघेही दिग्गज नेते प्रभाग ६ मध्ये सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फिरले. प्रत्येक घरात जाऊन, चौकात थांबून, छोट्या-छोट्या सभांमधून त्यांनी मतदारांना कमळाचे बटन दाबण्याची विनंती केली.

“प्रभाग ६ हा वणीचा महत्त्वाचा भाग आहे. इथे कमळ मोठ्या मतांनी फुलले तरच विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष म्हणून मजबूत पाठबळ मिळेल. या भागातील पाणीप्रश्न, खराब रस्ते, ड्रेनेज आणि स्वच्छतेचे प्रश्न तातडीने मार्गी लागतील,” अशी ग्वाही माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली. माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी महिलांना आवाहन करताना म्हणाले, “थम्मदिना पाते या प्रभागातील सक्षम व विश्वासू उमेदवार आहेत. त्यांना निवडून द्या, महिला सक्षमीकरणाच्या योजना व निधी प्राधान्याने मिळेल.”

शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी तरुणांना सांगितले, “विलास डवरे हे प्रभागातील अनुभवी व जनतेचे चेहरा आहेत. त्यांना साथ द्या तर येथील तरुणांना रोजगार, कौशल्य केंद्र आणि स्टार्टअपसाठी थेट मदत मिळेल.”

उद्या मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रभाग ६ च्या मतदारांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष आणि सौ. धम्मदिना पातेश्री. विलास डवरे यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यावे, अशी जोरदार विनंती भाजपने केली आहे.


www.WaniSamachar.com