♦️प्रभाग क्र. ५ वर भाजपचा जोरदार डल्ला, विद्याताई आत्रामांसह कमळाला प्रचंड मतांची ग्वाही..

182

● वणी नगरपरिषद निवडणूक ●

प्रभाग क्र. ५ वर भाजपचा जोरदार डल्ला, विद्याताई आत्रामांसह कमळाला प्रचंड मतांची ग्वाही

▪︎बोदकुरवार, बोर्डे, चौधरी यांची प्रभागात दिवसभर धडक; “प्रभाग ५ चे दोन्ही कमळ जिंकले तरच वणीचा विकास खऱ्या अर्थाने होईल”

वणी । दि. १ डिसेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी):

उद्या होणाऱ्या वणी नगरपरिषद मतदानाच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक ५ वर अतिशय आक्रमक व घराघरांतला प्रचार केला. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्यासह प्रभाग ५ मधील दोन्ही जागांवरील भाजपचे अधिकृत उमेदवार सौ. सोनाली प्रशांत निमकर (प्रभाग ५-अ, सर्वसाधारण महिला) आणि श्री. रीतीक लक्ष्मण मामीडवार (प्रभाग ५-ब, अनुसूचित जाती सर्वसाधारण) यांना प्रचंड मतांच्या फरकाने विजयी करण्याचे ठाम आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले.

प्रचारकाळात हे तिघेही नेते सकाळी १० वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत प्रभाग ५ मध्ये फिरले. प्रत्येक घरात जाऊन, दुकानात थांबून, चौकात छोट्या सभा घेऊन त्यांनी मतदारांना कमळाचे बटन दाबण्याची विनंती केली.

“प्रभाग ५ मध्ये कमळ मोठ्या मतांनी फुलले तरच विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष म्हणून मजबूत हात मिळेल. या भागातील पाणीटंचाई, खराब रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाइट्स आणि स्वच्छतेचे प्रश्न तातडीने सोडवले जातील,” अशी ग्वाही माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली. माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी महिलांना आवाहन करताना म्हणाले, “सोनाली निमकर या तरुण व ऊर्जावान उमेदवार आहेत. त्यांना निवडून द्या, महिला बचत गटांना विशेष निधी व प्रशिक्षण मिळेल.”

शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी तरुणांना सांगितले, “रीतीक मामीडवार हे प्रभागातील विश्वासू चेहरा आहेत. त्यांना साथ द्या तर येथील तरुणांना रोजगार, कौशल्य केंद्र आणि स्टार्टअपसाठी थेट मदत मिळेल.”

उद्या मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रभाग ५ च्या मतदारांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष आणि सौ. सोनाली निमकर श्री. रीतीक मामीडवार यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यावे, अशी जोरदार विनंती भाजपने केली आहे.


www.WaniSamachar.com