☀️प्रभाग क्र. ४ वर भाजपचा धुरळा, विद्याताई आत्रामांसह कमळाला प्रचंड मतांची खात्री

142

● वणी नगरपरिषद निवडणूक ●

प्रभाग क्र. ४ वर भाजपचा धुरळा, विद्याताई आत्रामांसह कमळाला प्रचंड मतांची खात्री

▪︎बोदकुरवार, बोर्डे, चौधरी यांची घराघरांत धडक; “प्रभाग ४ चे कमळ जिंकले तरच वणीचा विकास वेगवान होईल”


वणी । दि. १ डिसेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी):

वणी नगरपरिषदेच्या उद्याच्या मतदानाच्या पूर्व भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक ४ वर अतिशय जोरदार प्रचार केला. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्यासह या प्रभागातील दोन्ही जागांवर भाजपचे अधिकृत उमेदवार श्रीमती अर्चना संजय पुनवटकर (प्रभाग ४-अ, अनुसूचित जाती महिला) आणि श्री. राकेश लक्ष्मण बुग्गेवार (प्रभाग ४-ब, सर्वसाधारण) यांना प्रचंड मतांच्या फरकाने विजयी करण्याचे ठाम आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले.

प्रचारादरम्यान हे तिघेही नेते प्रभाग ४ मध्ये सकाळपासून रात्रपर्यंत फिरले. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात थांबून, घराघरांत जाऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. “प्रभाग ४ हा वणीचा महत्त्वाचा भाग आहे. इथे कमळ मोठ्या मतांनी जिंकले तरच विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष म्हणून मजबूत पाठबळ मिळेल,” असे ठाम प्रतिपादन माजी आमदार बोदकुरवार यांनी केले.

माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी महिलांना आवाहन करताना म्हणाले, “अर्चना पुनवटकर या प्रभागातील विश्वासू व सक्षम उमेदवार आहेत. त्यांना निवडून द्या, तर या भागातील पाणी, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज आणि महिला सक्षमीकरणाच्या योजना प्राधान्याने पूर्णे मिळतील.” शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी तरुणांना सांगितले, “राकेश बुग्गेवार हे प्रभागातील तरुण चेहरा आहेत. त्यांना साथ द्या तर येथील बेरोजगारांना रोजगार व कौशल्य प्रशिक्षणाची संधी मिळेल.”

उद्या मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रभाग ४ च्या मतदारांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष आणि अर्चना पुनवटकरराकेश लक्ष्मण बुग्गेवार यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यावे, अशी जोरदार विनंती भाजपने केली आहे.


www.WaniSamachar.com