♦️प्रभाग क्र. ७ वर भाजपचा प्रचंड जोर, विद्याताई आत्रामांसह कमळाला रेकॉर्ड मतांची अपेक्षा..

188

● वणी नगरपरिषद निवडणूक ●

प्रभाग क्र. ७ वर भाजपचा प्रचंड जोर, विद्याताई आत्रामांसह कमळाला रेकॉर्ड मतांची अपेक्षा

▪︎बोदकुरवार, बोर्डे, चौधरी यांची प्रभागात दिवसभर धडक; “प्रभाग ७ चे दोन्ही कमळ मोठ्या फरकाने जिंकले तरच वणीला विकसित शहराचा दर्जा मिळेल”


वणी । दि. १ डिसेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी):

उद्या होणाऱ्या वणी नगरपरिषद मतदानाच्या  दिवशी भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक ७ वर कमालीचा आक्रमक आणि घराघरांतील प्रचार केला. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्यासह या प्रभागातील दोन्ही जागांवरील भाजपचे अधिकृत उमेदवार सौ. उषा नथ्थुजी डुकरे (प्रभाग ७-अ, सर्वसाधारण महिला) आणि श्री. नितीन गोपालराव धाबेकर (प्रभाग ७-ब, नागरिक मागास प्रवर्ग सर्वसाधारण) यांना प्रचंड मतांच्या फरकाने विजयी करण्याचे ठाम आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले.

प्रचाराच्या काळात हे तिघेही नेते सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत प्रभाग ७ मध्ये फिरले. प्रत्येक घरात जाऊन, दुकान-दुकानात थांबून, चौकात सभा घेऊन त्यांनी मतदारांना कमळाचे बटन दाबण्याची आग्रहाची विनंती केली.

“प्रभाग ७ मध्ये कमळ रेकॉर्ड मतांनी फुलले तरच विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष म्हणून वणीला केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपूर लाभ मिळवता येईल. या भागातील पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाइट्स आणि स्वच्छतेचे प्रश्न कायमचे संपतील,” अशी खंबीर ग्वाही माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली.

माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी महिलांना आवाहन करताना म्हणाले, “उषा डुकरे या प्रभागातील अत्यंत मेहनती व जनसामान्यांच्या उमेदवार आहेत. त्यांना मोठ्या मतांनी निवडून द्या, महिलांसाठी विशेष निधी व बचत गटांना बळ मिळेल.”

शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी तरुण व व्यापाऱ्यांना सांगितले, “नितीन धाबेकर हे प्रभागातील तरुण व सक्षम चेहरा आहेत. त्यांना साथ द्या तर येथील बाजारपेठेचा विकास, पार्किंग, तरुणांसाठी रोजगार केंद्र उभारले जातील.”

उद्या मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रभाग ७ च्या मतदारांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष आणि सौ. उषा डुकरेश्री. नितीन धाबेकर यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यावे, अशी हात जोडून विनंती भाजपने केली आहे.


www.WaniSamachar.com