○ प्रभाग क्र. ३ मध्ये भाजपचा दणदणीत प्रचार, विद्याताई आत्रामांसह कमळाला प्रचंड मतांची अपेक्षा

152

● वणी नगरपरिषद निवडणूक ●

प्रभाग क्र. ३ मध्ये भाजपचा दणदणीत प्रचार, विद्याताई आत्रामांसह कमळाला प्रचंड मतांची अपेक्षा

▪︎बोदकुरवार, बोर्डे, चौधरी यांचे घराघरांत; “प्रभाग ३ चे दोन्ही कमळ जिंकले तरच वणीला खऱ्या अर्थाने विकासाची गती मिळेल”


वणी । दि.१ डिसेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी):

वणी नगरपरिषदेच्या उद्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक ३ वर अतिशय आक्रमक आणि घराघरांतील प्रचार केला. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्यासह या प्रभागातील दोन्ही जागांवर भाजपचे अधिकृत उमेदवार श्रीमती वैशाली विनोद वातीले (प्रभाग ३-अ, नागरिक मागास प्रवर्ग महिला) आणि श्री. लक्ष्मण महादेव उरकुडे (प्रभाग ३-ब, सर्वसाधारण) यांना प्रचंड मतांच्या फरकाने विजयी करण्याचे ठाम आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले.

प्रचारात हे तिघेही दिग्गज नेते प्रभाग ३ मधील प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक आणि प्रत्येक घरात फिरले. दुपारी १२ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सतत जनसंपर्क करत त्यांनी मतदारांना कमळाचे बटन दाबण्याची विनंती केली.

“प्रभाग ३ मध्ये कमळ मोठ्या मतांनी जिंकले तरच विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष म्हणून मजबूत हात मिळेल. या प्रभागातील पाणीप्रश्न, रस्ते, ड्रेनेज आणि स्वच्छतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील,” असे आश्वासन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिले. माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी महिलांना आवाहन करताना म्हणाले, “वैशाली वातीले या तरुण व सक्षम उमेदवार आहेत. त्यांना निवडून द्या, महिलांसाठी विशेष निधी व योजना आणू.”

शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी तरुण वर्गाला सांगितले, “लक्ष्मण उरकुडे हे प्रभागातील विश्वासू चेहरा आहेत. त्यांना साथ द्या तर येथील तरुणांना रोजगार, कौशल्य केंद्र आणि स्टार्टअपसाठी थेट मदत मिळेल.”

उद्या मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रभाग ३ च्या मतदारांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष आणि वैशाली वातीलेलक्ष्मण उरकुडे यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यावे, अशी जोरदार विनंती भाजपने केली आहे.


www.WaniSamachar.com