प्रभाग क्र. २ वर भाजपचा जोरदार प्रचार, विद्याताई आत्रामांसह ‘कमळ’ला’ प्रचंड मतांची अपेक्षा..

136

● वणी नगरपरिषद निवडणूक ●

प्रभाग क्र. २ वर भाजपचा जोरदार प्रचार, विद्याताई आत्रामांसह ‘कमळ’ला’ प्रचंड मतांची अपेक्षा

▪︎बोदकुरवार, बोर्डे, चौधरी यांचे थेट आवाहन; “प्रभाग २ मध्ये कमळ फुलले तरच वणीला खरा विकास”


वणी । दि. १ डिसेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी):

वणी नगरपरिषदेच्या उद्याच्या मतदानाच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक २ वर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्यासह या प्रभागातील दोन्ही जागांवर भाजपचे अधिकृत उमेदवार सौ. दिप्ती महेश पहापळे (प्रभाग २-अ, सर्वसाधारण महिला) आणि श्री. आशीष ज्ञानेश्वर डंभारे (प्रभाग २-ब, नागरिक मागास प्रवर्ग सर्वसाधारण) यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे जोरदार आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हे तिघेही नेते प्रभाग २ मधील प्रत्येक गल्लीत फिरले. घराघरांत जाऊन, दुकानांमध्ये थांबून, चौकात सभा घेऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. “प्रभाग २ हा वणीचा हृदयस्थान आहे. इथे कमळ मोठ्या फरकाने फुलले तरच विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वात शहराचा खरा विकास होईल,” असे ठाम प्रतिपादन माजी आमदार बोदकुरवार यांनी केले. त्यांनी नागरिकांना “एक मत कमळाला द्या, आम्ही वणीला विकसित भारताचा नमुना बनवू” अशी ग्वाही दिली.

माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी प्रभागातील महिलांना आवाहन करताना म्हटले, “सौ. दिप्ती पहापळे या युवा व ऊर्जावान उमेदवार आहेत. त्यांना निवडून दिल्यास प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता, स्ट्रीट लाइट्स आणि महिला बचत गटांसाठी विशेष निधी मिळेल.” तर शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी तरुणांना सांगितले, “आशीष ड॔भारे हे प्रभागातील तरुण चेहरा आहेत. त्यांना साथ द्या, तर येथील बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी मिळतील.”

“कमळ या बोधचिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!” असे ठळक आवाहन करण्यात आले आहे.

उद्या मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रभाग २ मधील मतदारांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष तर सौ. दिप्ती पहापळे व श्री. आशीष डंभारे यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यावे, अशी विनंती भाजपने केली आहे.


www.WaniSamachar.com