भाग ७ : योग्य उमेदवार कसा ओळखायचा? १० मुद्दे..

755

 ◇ वणी न.प निवडणूक- २०२५ ◇ 

•• मतदार जागृती अभियान ••

     ११ दिवसांची विशेष मालिका     


भाग ७ : योग्य उमेदवार कसा ओळखायचा? १० मुद्दे


वणी । दि.२७/११/२०२५ :

टीम www.WaniSamachar.com तर्फे सर्व मतदार बंधू-भगिनींना सादर नमस्कार !

१. गेली पाच वर्षे तो कुठे होता? वर्षभर दिसायचा की फक्त निवडणुकीत?

२. त्याने किती कामे केली? फक्त फिती कापल्या की खरंच खड्डे बुजवले, दिवे लावले?

३. त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? (वेबसाइट myneta.info वर तपासा)

४. त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे?

५. तो पैशाने, दारूने, जातीने मत मागतो की कामाने?

६. त्याच्याकडे भ्रष्टही काळा डाग आहे का?

७. तो महिलांच्या सुरक्षेची, तरुणांच्या रोजगाराची काळजी घेतो का?

८. तो स्वच्छ चारित्र्याचा, प्रामाणिक आणि मेहनती आहे का?

९. तो गल्लीतल्या लोकांशी संवाद साधतो का?

१०. लोक काय म्हणतात? शेजाऱ्यांकडे, दुकानात चौकशी करा.

सर्वात महत्त्वाचे: पैशाने, दारूने, जाती-धर्माच्या नावावर, मोफत साडी-शर्ट-ब्लँकेट देऊन मत मागणारा उमेदवार हा तुमचा शत्रू आहे. त्याला घरात घालवूही नका! कोणत्याही अमिषाला, भुलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडा, व स्वतःचे, वार्डाचे, शहराचे भविष्य सुरक्षित करा.


टीम www.WaniSamachar.com चे सातवे आवाहन,

“चांगला उमेदवार निवडला की, चांगले दिवस आपोआप येतात !”


www.WaniSamachar.com