

● वणी न. प. निवडणूक २०२५ ●
वणीकरांनो, २९ तारखेला सज्ज व्हा ! बावनकुळे येणार कमळाला ‘मेगा बूस्ट’ द्यायला
▪︎२९ नोव्हेंबरला भव्य रॅली व सभा; विकास आराखडा घेऊन भाजपचा अंतिम धावा..
वणी । दि. २७ नोव्हेंबर २०२५ :

यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाने अंतिम टप्प्यात जोरदार शिंग लावली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा २९ नोव्हेंबरला शहराला धडकणार असून, २९ नगरसेवक व थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी भव्य रॅली व जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी हा दौरा भाजपाच्या प्रचाराला नवा वेग देणारा ठरेल, असा विश्वास पक्ष नेत्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळी १० वाजता शहरातून सुरू होणाऱ्या या भव्य रॅलीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चा व सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. दुपारी २ वाजता पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेत बावनकुळे साहेब थेट जनतेला संबोधित करतील. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम व २९ नगरसेवक यांच्या प्रचारार्थ ही सभा केंद्रित असणार आहे.

मंत्री बावनकुळे यांच्या या दौऱ्यात वणीच्या पुढील पाच वर्षांसाठी विकास आराखडा, नागरिक कल्याणकारी योजना व भाजपाच्या धोरणांचा प्रसार होईलच, तसेच नगर परिषदेचा मागचा भाजप कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा पण जनते समोर मांडला जाण्याची शक्यता आहे.
“२९ नोव्हेंबर ला होउ घातलेल्या या रॅलीत व सभेत वणीकरांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहुन भाजपला व भाजपचा मागील कार्यकाळात नगर परिषदे मार्फत केलेल्या विकास कार्याला आपला पाठींबा व समर्थन नोंदवावा.” असे आवाहन मा.आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांने केले आहे.
“वणीला आधुनिक शहर बनवण्यासाठी कमळाची ताकद हवी. जनतेने लोकशाही मजबूत करण्यासाठी या सभेत सहभागी व्हा,” असे आवाहन शहराध्यक्ष अँड निलेश चौधरी यांनी केले आहे.

या सभेत रस्ते, पाणी, स्वच्छता व महिलांच्या सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर ठोस आश्वासने दिली जाणार असून, पक्षाने घराघरांत प्रचाराला वेग दिला आहे.
या रॅली व सभेमुळे वणीतील प्रचार वातावरण आणखी तापेल आणि भाजपाच्या उमेदवारांना जनाधार मिळेल, अशी अपेक्षा आहे. विरोधकांना आव्हान देणाऱ्या या धावेने निवडणुकीचा निकाल कमळाच्या बाजूने कलत असल्याचे संकेत मिळत आहेत.
www.WaniSamachar.com









