भाग 6 : आज चूक केली तर पुढची पाच वर्षे रोज रडावे लागेल!

705

 ◇ वणी न.प निवडणूक- २०२५ ◇ 

•• मतदार जागृती अभियान ••

     ११ दिवसांची विशेष मालिका     


भाग ६ : आज चूक केली तर पुढची पाच वर्षे रोज रडावे लागेल!


वणी । दि.२६/११/२०२५ :

टीम www.WaniSamachar.com तर्फे सर्व मतदार बंधू-भगिनींना सादर नमस्कार !

गेल्या निवडणुकीत आपण काय केले? “सर्वच चोर आहेत”, “कोणाला तरी निवडून द्या” म्हणून घरी बसलो किंवा भावनेच्या भरात, जात-धर्म पाहून कुणाला तरी मत दिले. परिणाम काय झाला?

  • पावसाळ्यात रस्त्यांवर बोटी फिरायला लागल्या
  • कचरा डोंगर झाला
  • पथदीप बंद, रात्री अंधार
  • पाणी यायचे तेही बंद
  • नगरसेवकाचा फोन लागायचा नाही रोज ओरडलो, पोस्ट लिहिल्या, आंदोलन केले… पण निवडलेला माणूस म्हणायचा, “आता पुढची निवडणूक बघा!”

आता पुन्हा तीच चूक करायची का? एकदा चुकीचा माणूस निवडला की पाच वर्षे तोच आपला “मालक” राहणार.

आज ५००-१००० रुपये किंवा एक बॉटल घेऊन मत विकले, तर पाच वर्षे रोज लाखो रुपयांचे नुकसान होईल. कोणत्याही अमिषाला, भुलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडा, व स्वतःचे, वार्डाचे, शहराचे भविष्य सुरक्षित करा.


टीम www.WaniSamachar.com चे सहावे आवाहन,

“पाच वर्षे रोज रडायचे की अभिमानाने डोकं उंच करायचे? निवड तुमची!”


www.WaniSamachar.com