● प्रभाग ६ मध्ये कमळाचा प्रचंड विजयध्वज प्रचार.

543

● वणी न.प. निवडणूक २०२५ ●

प्रभाग ६ मध्ये कमळाचा प्रचंड विजयध्वज प्रचार !

▪︎बोदकुरवारांच्या नेतृत्वात भव्य रॅली अन् घरघर संपर्क;

▪︎धम्मदीना-विलास-विद्याताईंना प्रेमाचा महापूर


वणी । दि. २६ नोव्हेंबर २०२५ :

प्रभाग क्रमांक ६ आज कमळाच्या रंगात बुडाला! नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्याताई खेमराज आत्राम, प्रभाग ६ (अ) च्या उमेदवार सौ. धम्मदीना हरिष पाते आणि प्रभाग ६ (ब) चे उमेदवार श्री. विलास मारोतराव डवरे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः कमान सांभाळली. सकाळपासूनच सुरू झालेली भव्य रॅली आणि घरघर संपर्क अभियानाने संपूर्ण प्रभागात विकासाचा संदेश घरोघरी पोहोचवला.

ढोल-ताशे आणि “कमळ फुलवा, वणीत पुन्हा विकास घडवा”च्या गजरात रॅलीने प्रभाग दणाणून सोडला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुकर व अंकुश बोढे, जिल्हा सचिव नितीन वासेकर, शहराध्यक्ष ॲड. नीलेश चौधरी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक दीपक पाऊणकर, महामंत्री हितेन अटारा, व्यापारी आघाडी सरचिटणीस नितीन बिहारी, तुकाराम माथनकर, कैलास पिंपराडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रॅलीला ताकद दिली.

प्रभागातील जनतेने उमेदवारांचे हृदयस्पर्शी स्वागत केले. सौ. धम्मदीना पाते यांना महिलांनी आशीर्वाद दिला, विलास डवरे यांना युवकांनी खांद्यावर उचलले, तर विद्याताई आत्राम यांच्याभोवती प्रेमाचा गराडाच पडला. प्रत्येक गल्लीत “यावेळेस कमळच!” अशी एकच हाक होती.

मा.आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी जनतेला संबोधित करताना सांगीतले, “प्रभाग ६ मधला हा प्रेमाचा महासागर सांगतोय की इथे कमळ फुलणारच! धम्मदीना, विलास आणि विद्याताईंच्या हातात प्रभागाची प्रगती आहे. तुमचा एक मत वणीला नवी उभारी देईल.”

विद्याताई आत्राम यांनी आश्वासन दिले, “तुम्ही दाखवलेला विश्वास आम्हाला रात्रंदिवस काम करण्याची ताकद देतो. प्रभाग ६ ची प्रत्येक समस्या आम्ही प्राधान्याने सोडवू.”

प्रभाग ६ मधील हा अभूतपूर्व जनस्पंदन पाहता,  ‘कमळाचा विजय आता पूर्णपणे निश्चित मानला जातोय’, अशी प्रभाग६ चा मतदात चर्चा आहे.


www.WaniSamachar.com