मोमीनपुरा मध्ये शेकडो मुस्लिम युवकांचा जल्लोषात भाजप पक्षप्रवेश…

1149

  वणी नगरपरिषद निवडणूक २०२५  

मोमीनपुरा मध्ये भाजपचा ‘युवा धडाका’! शेकडो मुस्लिम युवकांचा जल्लोषात पक्षप्रवेश, उमेदवारांचा भव्य सत्कार

▪︎नगराध्यक्ष उमेदवार विद्याताई आत्राम व प्रभाग 10 चे दोन्ही उमेदवार आरतीताई वांढरे व अनीलजी चिंडालीया यांना पाठींबा.

वणी (जि. यवतमाळ) । दि.२३/११/२०२५ :

वणी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असतानाच, प्रभाग क्रमांक १० (मोमीनपुरा) मध्ये भारतीय जनता पार्टीला (भाजप) मोठा उत्साहपूर्ण पाठबळ मिळाला आहे. शेकडो मुस्लिम युवकांनी जल्लोषात भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाला नवी ऊर्जा दिली, तर प्रभागातील भाजप उमेदवारांचा भव्य सत्कार करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे प्रभागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, भाजपच्या प्रचाराला प्रचंड जोर मिळाला आहे.

मा.आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः उपस्थित राहून भाजपचा दुपट्टा गळ्यात घालत या युवकांचे पक्षात मनापासून स्वागत केले. “हा पक्षप्रवेश ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे ब्रीदवाक्य येथे सार्थक झाले आहे,” असे ते म्हणाले.

प्रवेश करणाऱ्या प्रमुख युवकांमध्ये सादिक अन्सारी, ऐबाझ खान यांच्या नेतृत्वाखाली रिजवान शेख, मोसीन वारसी, आमीर अली, जुफ्रान खान, मोहसीन शेख, रिझ्झू भाई, तस्लीम शेख, सलमान शेख, झुबेर शेख, अफसान सिद्दीकी, अमन वारसी, सरताज सिद्दीकी, सद्दाम शेख, शकील खान, साहिल शेख, सुरज भाई, साहिल सिद्दीकी, सोहेल खान, नुरुल अन्सारी, अक्रम खान, अयान खान, समीर पठाण यांच्यासह आणखी शेकडो युवकांचा समावेश आहे.

कार्यक्रमात प्रभाग १० चे भाजप उमेदवार आरतीताई वांढरेअनिलजी चिंडालिया तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या तिघांनाही उपस्थित युवकांनी एकमताने पाठींबा जाहीर केला.

▪︎प्रमुख उपस्थिती :

  • नीलेश चौधरी (अध्यक्ष, वणी शहर भाजपा)
  • अंकुश बोढे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप)
  • अरुण कावडकर (ज्येष्ठ नेते, वणी भाजप)
  • फारूक चिनी
  • विद्याताई आत्राम (नगराध्यक्ष उमेदवार)
  • आरतीताई वांढरेअनिल चिंडालिया (प्रभाग १० उमेदवार)

आरतीताई वांढरे यांनी “प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करू” असे आश्वासन दिले. अनिलज चिंडालिया म्हणाले, “मोमीनपुराला भाजपच्या हातात खरा विकास आणि नवे स्वरूप मिळेल.”

वणी शहर भाजप अध्यक्ष नीलेश चौधरी यांनी सांगितले, “हे युवकांचे प्रवेश वणीच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देतील. मोमीनपुरातील जनतेने भाजपवर विश्वास टाकला आहे, हीच आमची खरी ताकद आहे.”

या सोहळ्यामुळे प्रभाग १० मधील निवडणुकीची स्पर्धा आता भाजपच्या बाजूने भक्कम झाली असून, अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक नागरिक म्हणाले, “शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश पाहून अभिमान वाटतो. आता मोमीनपुराला खरा विकास मिळेल, हीच तरुणांची ऊर्जा विकासाची हमी आहे!”

” वणी नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोमीनपुरातून मिळालेला हा ‘युवा बूस्ट’ आता संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. “


www.WaniSamachar.com