

वणी नगरपरिषद निवडणूक-२०२५
प्रभाग क्र. २ मध्ये मा. आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात भाजपचा जोरदार प्रचार दौरा
▪︎भाजपचा उमेदवांना मिळतोय मातदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
वणी (यवतमाळ) । दि. २३/११/२०२५ :
वणी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीला प्रभाग क्रमांक २ मधून प्रचंड उत्साहपूर्ण पाठबळ मिळत आहे.

आज मा.आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्र. २ चा संपूर्ण प्रचार दौरा पार पडला. यावेळी नागरिकांनी उमेदवारांना आणि भाजपला भरघोस प्रतिसाद दिला.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम, प्रभाग क्र. २ (अ) च्या उमेदवार सौ. रीता महेश पाहापळे आणि प्रभाग क्र. २ (ब) चे उमेदवार श्री. आशिष ज्ञानेश्वर डंभारे यांच्यासह मा. आमदार बोदकुरवार यांनी घराघरात जाऊन मतदारांना विश्वासात घेतले. रस्त्यारस्त्यावर नागरिकांनी घोषणाबाजी करून उमेदवारांचे जोरदार स्वागत केले.
▪︎या दौऱ्यात प्रमुख उपस्थिती :
भाजपा ज्येष्ठ नेते खाडे सर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, भाजपा जिल्हा सचिव संतोष डंभारे, भाजपा तालुकाध्यक्ष (पूर्व) प्रदीप जेऊरकर, भाजपा तालुकाध्यक्ष (पश्चिम) मीराताई पोतराजे, भाजपा वणी शहराध्यक्ष ॲड. नीलेश चौधरी, नितीन वासेकर, तुकाराम माथनकर, सचिन खाडे, महेश देठे, जयमालाताई दर्वे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव श्रेयस हरणे,भाजपा तालुका व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रचारादरम्यान बोलताना मा.आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार म्हणाले, “वणीचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वात वणीला स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त शहर बनवू. प्रभाग २ मधील जनतेचा आज मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजपचा विजय निश्चित आहे.”
नगराध्यक्ष उमेदवार विद्याताई आत्राम यांनी सांगितले, “प्रभाग २ मधील पाणीप्रश्न, रस्ते, दिवाबत्ती, कचरा व्यवस्थापन यावर तात्काळ तोडगा काढू. आम्ही केवळ आश्वासन नाही, तर काम करून दाखवणार आहोत.”
उमेदवार रीता पाहापळे आणि आशिष डंभारे यांनीही प्रभागातील मूलभूत सुविधा आणि युवक-महिला सक्षमीकरणावर भर देण्याचे आश्वासन दिले.
स्थानिक नागरिक म्हणाले, “बोदकुरवार साहेब यांनी यापूर्वीच खूप कामे केली आहेत. यावेळी पूर्ण पॅनलसह भाजपलाच मत देऊ.” प्रभागातील महिलांनी मोठ्या संख्येने प्रचारात सहभाग घेतला आणि “यंदा कमळाच फुलणार!” अशा घोषणा दिल्या.

प्रभाग क्र. २ मधून भाजपला मिळत असलेला हा वाढता पाठबळ आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, या प्रभागात भाजपची बाजू अतिशय मजबूत झाल्याचे चित्र आहे.
Www.WaniSamachar.com









