प्रभाग 10 : भाजप चा ‘हर घर संपर्क’ अभियानाला प्रचंड प्रतिसाद..

307
• वणी नगर परिषद निवडणूक २०२५ •

प्रभाग १० मध्ये भाजपाची धडक

भाजप चा ‘हर घर संपर्क’ अभियानाला प्रचंड प्रतिसाद


वणी । दि. २३ नोव्हेंबर २०२५ :

वणी नगरपरिषद निवडणुकीत भाजपा ने कमालीची आक्रमकता दाखवली आहे. आज प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवार सौ.आरतीताई वांढरेअनिल चिंडालिया यांनी घराघरांत पोहोचून मतदारांशी थेट संवाद साधला. या ‘हर घर संपर्क व प्रचार अभियान’ला नागरिकांचा उस्फूर्त व प्रचंड प्रतिसाद मिळाला.

प्रभाग १० अ चे उमेदवार सौ.आरतीताई वांढरे व प्रभाग १० ब चे उमेदवार श्री.अनिल चिंडालिया यांनी कार्यकर्त्यांसह राबवलेल्या दमदार प्रचाराने संपूर्ण प्रभाग गजबजून गेला. पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व सुरक्षा या ज्वलंत प्रश्नांवर भाजपाने ठोस योजना व जलद अंमलबजावणीची हमी दिल्याने मतदारांमध्ये विश्वासाची नवी लाट निर्माण झाली आहे.

“आम्ही फक्त आश्वासनं देत नाही, काम करून दाखवतो,” असे सांगत उमेदवारांनी नागरिकांना भाजपाला साथ देण्याचे आवाहन केले. “वणीचा विकास हा आमचा संकल्प आहे. तुमचा एक मत आम्हाला ताकद देईल आणि वणीला नवी दिशा मिळेल,” असेही म्हणाले.

आजच्या प्रचारात भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण कावडकर, माजी सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक आशिष सिसोदिया, शहर कोषाध्यक्ष मयुर गोयनका, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष अनुप राठी, गिरीष वांढरे,अनिल अक्केवार,मंगेश चिंचोलकर, रोशन कटारीया, निकीत झामड, मुकुल खिवंसरा, ऐबाज खान, सादीक अंसारी, कुशाग्र खिवंसरा, रत्नाताई अंड्रसकर, आशा हस्तक, सोनिका साखरकर, ज्योती झिलपे, शारदा झिलपे, आरती झिलपे,  बेबीताई साखरकर, जयश्री अंड्रसकर, कवीता पचारे,स्मिता पटेल, निकीता पटेल, संगीता गेलडा यांच्यासह शहर पदाधिकारी, महिला मोर्चा व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नागरिकांनी उमेदवारांना आपल्या समस्या सांगितल्या आणि भाजपावर पूर्ण विश्वास दाखवला. अनेक ठिकाणी महिलांनी आरतीताई वांढरे यांचे स्वागत केले, तर युवकांनी अनिल चिंडालिया यांना विजयाची शुभेच्छा दिली.

विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वात व अनिल चिंडालिया-आरतीताई वांढरे यांचा रुपात प्रभाग १० मधे विजयी होणारच, पण संपूर्ण वणी नगरपरिषद भाजपाचीच होणार,” असा आत्मविश्वास मतदारांमध्ये दिसून आला.


Www.WaniSamachar.com