भाग ४ : नगरपरिषद-महापालिका निवडणूक का आपल्या आयुष्याशी थेट जोडलेली आहे?

877

 ◇ वणी न.प निवडणूक- २०२५ ◇ 

•• मतदार जागृती अभियान ••

     ११ दिवसांची विशेष मालिका     


भाग ४ : नगरपरिषद-महापालिका निवडणूक का आपल्या आयुष्याशी थेट जोडलेली आहे?


वणी । दि.२४/११/२०२५ :

टीम www.WaniSamachar.com तर्फे सर्व मतदार बंधू-भगिनींना कोटी कोटी नमस्कार !

पंतप्रधान-मुख्यमंत्री दिल्ली-मुंबईत राहतात. तुमच्या गल्लीत खड्डा पडला, कचरा पडला, पथदीप बंद पडला तर त्यांना काय फरक पडतो? पण नगरसेवक-महापौर हे तुमचे शेजारीच असतात. त्यांच्याकडेच खालील कामांचा अधिकार आहे:

  • रस्ते, गटारे, पथदीप, पाणीपुरवठा
  • कचरा संकलन, स्वच्छता
  • प्राथमिक शाळा, अंगणवाडी, दवाखाना
  • बांधकाम परवानग्या, करसवलती
  • बाजार समित्या, दुकान परवाने म्हणजे आपला नगरसेवक हा आपल्या गाव-शहराचा खरा CEO, खरा मालक आहे! हा CEO चांगला असेल तर पाच वर्षे सुख, वाईट असेल तर पाच वर्षे दुःख!

पैशाने, दारूने, जातीने मत मागणारा उमेदवार निवडून आला की पाच वर्षे तोच तुम्हाला लुबाडणार. कोणत्याही अमिषाला, भुलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडा, व स्वतःचे, वार्डाचे, शहराचे भविष्य सुरक्षित करा.


टीम www.WaniSamachar.com चे चौथे आवाहन,

तुमच्या गावाचा CEO तुम्हीच निवडणार आहात, काळजीपूर्वक निवडा !


www.WaniSamachar.com