भाग ३ : मतदान कसे करायचे? कोणाला करायचे? स्टेप बाय स्टेप..

670

 ◇ वणी न.प निवडणूक- २०२५ ◇ 

•• मतदार जागृती अभियान ••

     ११ दिवसांची विशेष मालिका     


भाग ३ : मतदान कसे करायचे? कोणाला करायचे? स्टेप बाय स्टेप


वणी । दि.२३/११/२०२५ :

टीम www.WaniSamachar.com तर्फे सर्व मतदार बंधू-भगिनींना कोटी कोटी नमस्कार !

१. आजच मोबाईल काढा → voters.eci.gov.in वर जा → तुमचे नाव, वॉर्ड क्रमांक टाका → नाव आहे का ते तपासा. नसेल तर तात्काळ फॉर्म ६ भरा.

२. जवळचे मतदान केंद्र कुठे आहे? → Voter Helpline App डाउनलोड करा किंवा १९५० वर फोन करा.

३. उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेळ आहे. घरातल्या सगळ्यांचे ओळखपत्र (वोटर आयडी, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, बँक पासबुकही चालते) घेऊन जा.

४. रांग लागली तरी संयम ठेवा. आत गेल्यावर पहिले अधिकारी तुमचे नाव तपासतील, दुसरे बोटाला शाई लावतील, तिसरे EVM दाखवतील.

५. तुमच्या पसंतीच्या उमेदवारासमोरील चिन्हाशेजारील बटन दाबा → “बीप” आवाज येईल → VVPAT मध्ये ७ सेकंद तुमचे चिन्ह दिसेल → बाहेर या, सेल्फी काढा!

▪︎कोणाला मत द्यायचे?

  • जो उमेदवार गेली पाच वर्षे तुमच्या दारात आला, पावसाळ्यात खड्डे भरले, तुमच्या घरी तुमच्या सु:ख-दु:खात हजेरी लावली.
  • जो फक्त निवडणुकीत “माझे वडील तुमच्यासाठी आयुष्यभर झिजले” म्हणतो आणि निवडून गेल्यावर गायब होतो, त्याला नाही!

दारूच्या बॉटलला, पैशाच्या पुडीला, नव्या साडी-शर्टला विकलेले मत पाच वर्षे तुम्हाला गुलाम बनवते. कोणत्याही अमिषाला, भुलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडा, व स्वतःचे, वार्डाचे, शहराचे भविष्य सुरक्षित करा.


टीम www.WaniSamachar.com चे तिसरे आवाहन,

” आधी मतदान, नंतर चहा-पोहे, जल्लोष आणि फटाके! “


www.WaniSamachar.com