वणी नगरपरिषद निकालाची धडक : उद्या २१ डिसेंबरला कमळ, धनुष्यबाण की मशाल… कोण फुलणार?

1675

वणी नगरपरिषद निकालाची धडक : उद्या २१ डिसेंबरला कमळ, धनुष्यबाण की मशाल… कोण फुलणार?

▪︎भाजप, शिवसेना (शिंदे), मविआत तिरंगी लढत; ६ फेऱ्यात १३ टेबलवर मतमोजणी, सकाळी १० वाजता सुरुवात.


वणी । दि. २० डिसेंबर २०२५ :

▪︎ Call : 9021203010.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल उद्या रविवारी (२१ डिसेंबर) जाहीर होणार आहे. गेल्या १९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), महा विकास आघाडी (शिवसेना उबाठा, काँग्रेस, मनसे) यांच्यात नगराध्यक्ष पदासह सर्व २९ जागांवर तिरंगी चुरस पाहायला मिळाली आहे. कोणता पक्ष बहुमत मिळवून नगरपरिषदेवर झेंडा फडकावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतमोजणी सकाळी ठीक १० वाजता सुरू होईल आणि १३ टेबलांवर ६ फेऱ्यांत पूर्ण होईल. सर्वप्रथम बॅलेट पेपरची मोजणी होईल, त्यानंतर EVM उघडल्या जातील. फेऱ्यांचा क्रम असा राहील :

  • फेरी १ : प्रभाग १ ते ३,
  • फेरी २ : प्रभाग ४ ते ६,
  • फेरी ३ : प्रभाग ७ ते ९,
  • फेरी ४ : प्रभाग १० ते १२,
  • फेरी ५ : प्रभाग १३ ते १४ (अ,ब)
  • फेरी ६ : प्रभाग १४ (क)

■ नगराध्यक्षपदाची मुख्य लढत

मा.आ.संजिवरेड्डी बोदकुरवार हे भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांचा रुपाने भाजपचा २०१६ च्या विजयी परंपरेला कायम ठेवून पुन्हा कमळ फुलवणार का? की विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात महा विकास आघाडीच्या शिवसेना (उबाठा) उमेदवार सौ.संचिता नगराळे यांना नगराध्यक्षपदी बसवण्यात यश मिळेल? दुसरीकडे, अलीकडेच भाजप सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणारे विजय चोरडिया यांनी पक्षात नवीन ऊर्जा आणली आहे. ते शिवसेनेच्या कु. पायल तोडसाम यांना नगराध्यक्ष पदी विजयी करू शकतील का? या तिन्ही उमेदवारांभोवती प्रचाराची मुख्य धुरळा उडाली होती.

■ नगरसेवक जागांचाही रंजक सामना

नगराध्यक्षपदा बरोबरच कोणता पक्ष सर्वाधिक नगरसेवक निवडून आणतो, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपला मागील निवडणुकीतील एकछत्र कायम ठेवता येईल की शिवसेना (शिंदे) किंवा मविआ नवीन समीकरण घडवतील, यावर शहराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा अवलंबून आहे.

वणीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदानाच्या दिवशी ६६.८३ टक्के मतदान झाले होते, ज्यामुळे निकाल अनपेक्षित ठरू शकतो. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते आणि नेत्यांची गर्दी अपेक्षित आहे. निवडणूक प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली असून, निकाल शांततेत जाहीर होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

उद्या वणीच्या राजकीय इतिहासात नवीन पान उमटणार… कोणाचा झेंडा फडकणार?


www.WaniSamachar.com