मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दिलासा ! वणी नगर परिषदेच्या ३ ते ६ पट करवाढीस स्थगिती; मा.आ. बोदकुरवार यांच्या पाठपुराव्याला यश..

1386

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दिलासा ! वणी नगर परिषदेच्या ३ ते ६ पट करवाढीस स्थगिती; मा.आ.बोदकुरवार यांच्या पाठपुराव्याला यश..


वणी । ३१ ऑक्टोबर २०२५ :

वणी नगर परिषदेने २०२५-२६ ते २०२८-२९ या कालावधीसाठी प्रस्तावित केलेल्या चतुर्थ वार्षिक करमूल्यांकनाला (३ ते ६ पट वाढ) पूर्ण स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेऊन वणीकर जनतेला मोठा दिलासा दिला आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला.

काही दिवसांपूर्वी वणी नगर परिषदेने नागरिकांना नोटिसा पाठवून करात ३ ते ४ पट, काही ठिकाणी ६ पट वाढ प्रस्तावित केली होती. ही वाढ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५च्या तरतुदींविरोधी असून, जनतेच्या आर्थिक नुकसानकारक होती. .

दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी बोदकुरवार व भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. त्यात करवाढ तात्काळ स्थगित करण्याची विनंती केली होती. या निवेदनाची त्वरित दखल घेऊन मुख्यमंत्री सचिवालयाने वणी नगर परिषदेला अधिकृत पत्र पाठवले असून, प्रस्तावित करआकारणी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

● बोदकुरवारांचे आभार व आश्वासन

प्रसंगी मा.आ. संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले,

“मी आमदार नसलो तरी वणीकर जनतेच्या सेवेत सदैव तत्पर आहे. कोणत्याही परिस्थितीत जनतेला त्रास होऊ देणार नाही. ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या भावनांचा आदर करून हा निर्णय घेतला, त्यांचे वणीकर जनतेच्या वतीने मी मनापासून आभार मानतो.”

भाजपा नेत्यांनी यापूर्वीच जनतेला “आनंदाची बातमी येणार” असे सांगितले होते. आज हा निर्णय जाहीर होताच शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. व्यापारी, गृहिणी व मध्यमवर्गीय नागरिकांनी बोदकुरवार व फडणवीस यांचे आभार मानले.

हा निर्णय वणी शहराच्या इतिहासातील जनतेच्या बाजूने उभ्या राहिलेल्या नेत्यांचा विजय मानला जात आहे. शहरातील विविध संघटना व नागरिकांनी मा.आ.बोदकुरवार यांचे अभिनंदन केले आहे.

धन्यवाद देवाभाऊ
वणी नगर परिषद द्वारा सन 2025-26 ते 2028-29 च्या प्रस्तावित केल्या गेलेल्या चतुर्थ वार्षीक कर मुल्यांकनास स्थगीती दिल्याबद्दल…!!!

ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी
शहर अध्यक्ष : भारतीय जनता पार्टी, वणी


www.WaniSamachar.com


■□■