वणी : मुलीला कार चालवणे शिकवताना भीषण अपघात..

3494

वणी : मुलीला कार चालवणे शिकवताना भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाचहीजणांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात शोककळा..


वणी । ३१ ऑक्टोबर २०२५ :

यवतमाळ जिल्ह्यातील वणी-लालगुडा मार्गावरील जन्नत हॉटेलजवळ आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील वडील, तिन मुली व एक लहान भावाची चार वर्षाचा चिमुकलीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भीमनगर व लालपुलिया परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण वणी शहर शोकमग्न झाले आहे. अपघात इतका भयावह होता की, चार वर्षीय चिमुकलीचा उपचाराकरीता चंद्रपूर नेत असताना वाटेत मृत्यू झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास भीमनगर येथील रहिवासी व लालपुलिया परिसरातील मेकॅनिक रियाजभाई मिस्त्री (वय ५५) हे आपल्या मुलीला कार चालवणे शिकवत होते. स्कोडा कार (नोंदणी क्र. MH 01-AH-5700) त्यांची मोठी मुलगी लियाबा (वय २०) चालवत होती. त्यांच्या सोबत आणखी तीन मुली – मायरा, अमिरा आणि चार वर्षीय लहान चिमुकली – गाडीत होत्या. टर्न घेत असताना अचानक समोरून आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कार पूर्णपणे विकृत झाली.

या भीषण अपघातात रियाजभाई मिस्त्री, लियाबा, मायरा आणि अमिरा हे चार जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. याचवेळी चार वर्षीय चिमुकली जखमी असल्याने तिला तात्काळ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आली. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबातील एक पुरुष व चार मुलींचा एकाच अपघातात बळी गेल्याने नातेवाईक व शेजाऱ्यांमध्ये दु:खाची लाट उसळली आहे.

रियाजभाई मिस्त्री हे स्थानिक मेकॅनिक म्हणून ओळखले जाणारे होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वणी तालुक्यातील हा अपघात रस्त्यावरील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकतो.


www.WaniSamachar.com


■□■