

नगरसेवक हा शहराच्या विकासाचा आणि नागरिकांच्या हिताचा आधारस्तंभ असतो. तो केवळ राजकीय पद नाही, तर जबाबदारी आणि सेवेचे प्रतीक आहे. खालील गुण आणि कृतींमुळे तो योग्य ठरतो:

१. प्रामाणिक आणि पारदर्शी :
-
भ्रष्टाचारापासून दूर राहणे.
-
प्रत्येक निर्णय आणि खर्चाचा हिशोब जनतेला देणे.
-
निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करणे.
२. नागरिकांच्या जवळचा :
-
वार्डातील प्रत्येक समस्या (पाणी, रस्ते, कचरा, सुरक्षा, ई.) ऐकून घेणे.
-
दर आठवड्यात जनता दरबार किंवा भेटीचे वेळ ठेवणे.
-
सोशल मीडिया, व्हॉट्सअप गृपद्वारे सतत संपर्कात राहणे.

३. दूरदृष्टी असलेला :
-
शहराच्या मास्टर प्लॅनला प्राधान्य देणे.
-
स्मार्ट सिटी, हरित ऊर्जा, पावसाळी पाणी साठवण यासारखे दीर्घकालीन प्रकल्प राबवणे.
-
अनधिकृत बांधकामे थांबवून नियोजनबद्ध विकास करणे.
४. सक्षम आणि कार्यक्षम :
-
नगरपालिकेच्या बैठकीत मुद्देसूद बोलणे.
-
निधी मिळवण्यासाठी राज्य/केंद्र सरकारशी प्रभावी संवाद साधणे.
-
शक्यतो तक्रारींचे ७२ तासांत निवारण करणे (उदा. खड्डे, दिवे, कचरा).

५. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील :
-
गरीब, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी विशेष योजना राबवणे.
-
शिक्षण, आरोग्य, खेळ यासाठी निधी आणि सुविधा उपलब्ध करणे.
-
सण-उत्सव, आपत्ती यात पुढाकार घेणे.
६. राजकारणा पलीकडे :
-
पक्षीय भेदभाव न करता सर्वांसाठी काम करणे.
-
विरोधी पक्षाच्या चांगल्या सूचनांचा स्वीकार करणे.
-
निवडणुकीनंतरही ५ वर्षे सतत सक्रिय राहणे.
: शेवटी :
योग्य नगरसेवक हा “जनतेचा सेवक” असतो, “नेता” नव्हे. तो शहराला स्वच्छ, सुरक्षित, सुंदर आणि समृद्ध बनवतो. अशा व्यक्तीला मत द्या, ज्याच्याकडे व्हिजन + वर्क + विश्वास असेल.
“शहर सुंदर असेल,तर जीवन आनंदी असेल.” – तुमचा पुढचा नगरसेवक असा असू दे !
■□■








