नायगाव (खु.) विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन कार्यालयाचे भव्य लोकार्पण..

1086

नायगाव (खु.) विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन कार्यालयाचे भव्य लोकार्पण; आमदार बोदकुरवार यांच्या हस्ते उद्घाटन..

वणी । ३० ऑक्टोबर २०२५ :

वणी तालुक्यातील नायगाव (खु.) विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित (नोंदणी क्र. २००) च्या नवीन कार्यालय इमारतीचे भव्य लोकार्पण सोहळा आज पार पडला. या इमारतीचे उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अशोकजी सुर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली वडगाव रोड, वणी येथे ही नविन इमारत उभी राहिली असून, शेतकरी बांधवांसाठी ती मीलाचा दगड ठरणार आहे.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजयजी पिंपळशेंडे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल कौतुक व्यक्त करताना, सहकार क्षेत्रातील अशा उपक्रमांना भाजप सरकारकडून नेहमीच प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना, “सहकार हा शेतकऱ्यांचा खरा साथी आहे. हे लोकार्पण केवळ इमारतीचे नाही, तर ग्रामीण विकासाचे प्रतीक आहे,” असे नमूद केले. त्यांनी संस्थेच्या भविष्यातील विस्तारासाठी वचनबद्धता दर्शवली.

मान्यवरांचा हस्ते इमारतीच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला गेला. या वृक्षारोपणात स्थानिक शेतकरी बांधवांसह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाला असंख्य शेतकरी बांधवांसह संस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

■□■