

वणी । दि. ३० ऑक्टोबर २०२५ :
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’ या राष्ट्रीय एकता दौडचे (मॅरेथॉन) आयोजन उद्या ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठीक ७ वाजता वणी शहरात होणार आहे. यवतमाळ पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब यांच्या संकल्पनेतून वणी पोलीस स्टेशनच्या वतीने हे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
या ५ किलोमीटर दौडची सुरुवात टिळक चौक, वणी येथून होईल. मार्ग वरोरा रोड मार्गे कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत जाऊन परत टिळक चौक येथे समाप्त होईल. “देश की एकता और अखंडता” या संकल्पनेवर आधारित ही दौड शहरातील सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र आणणारी ठरणार आहे.

वणी पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, शाळा-महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी, पत्रकार बंधू, व्यापारी संघटना, वकील संघ, डॉक्टर एसोसिएशन, रोटरी क्लब, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व वणीकर यांनी टी-शर्ट, लोअर, ट्रॅक सूट आणि स्पोर्ट्स शूज घालून पूर्ण तयारीसह उद्या सकाळी ठीक ७ वाजता टिळक चौक येथे उपस्थित राहावे.
“ही दौड केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. सरदार पटेल यांनी एक भारत-श्रेष्ठ भारत घडवले, त्याच संकल्पनेला सलाम करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन पोलीस निरीक्षक उंबरकर यांनी केले.
कार्यक्रमाला पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
-
ठिकाण : टिळक चौक, वणी
-
दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२५
-
वेळ : सकाळी ७:०० वाजता
-
अंतर : ५ किलोमीटर
■□■









