प्रज्वल ठेंगणे, श्रेयस हरणे, शुभम इंगळे यांची भाजयुमो जिल्हा कार्यकारिणीत नियुक्ती..

882

प्रज्वल ठेंगणे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष पदी तर श्रेयस हरणे, शुभम इंगळे यांची भाजयुमो जिल्हा सचिवपदी नियुक्ती.

वणी, दि. २९ ऑक्टोबर २०२५ : भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण बदल घडवताना, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुलजी चौहान यांच्या शिफारशीवरून भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुरजजी गुप्ता कडून प्रज्वल ठेंगणे यांची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष पदी तर श्रेयस हरणे व शुभम इंगळे यांची यवतमाळ जिल्हा भाजयुमो सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी प्रज्वल ठेंगणे, श्रेयस हरणे व शुभम इंगळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

नियुक्ती : प्रज्वल ठेंगणे (जिल्हा भाजयुमो)
नियुक्तीपत्र : प्रज्वल ठेंगणे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजयुमो)
नियुक्ती : श्रेयस हरणे (जिल्हा सचिव, भाजयुमो)
नियुक्तीपत्र : श्रेयस हरणे (जिल्हा सचिव, भाजयुमो)
नियुक्तीपत्र : शुभम इंगळे (जिल्हा सचिव, भाजयुमो)
नियुक्तीपत्र : शुभम इंगळे (जिल्हा सचिव, भाजयुमो)

नियुक्तीप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुलजी चौहान, मा.आ. संजीवरेड्डीजी बोदकुरवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजुभाऊ पडगीलवार, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष कुणालजी चोरडीया, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुरजजी गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नियुक्तीपत्र : श्रेयस हरणे (जिल्हा सचिव, भाजयुमो) 1
नियुक्तीपत्र : श्रेयस हरणे (जिल्हा सचिव, भाजयुमो) 
नियुक्तीपत्र : शुभम इंगळे (जिल्हा सचिव, भाजयुमो) 1
नियुक्तीपत्र : शुभम इंगळे (जिल्हा सचिव, भाजयुमो) 

या नियुक्तीमुळे भाजयुमोच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, प्रज्वल ठेंगणे, श्रेयस हरणे व शुभम इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील युवा मोर्च्याच्या कार्याला अधिक गती मिळेल व भाजयुमोचे संघटनात्मक सक्षमीकरण होईल अशी अपेक्षा असल्याचे मा.आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगीतले.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नियुक्ती ‘युवा’ कार्यकर्त्यांना अधिक जबाबदाऱ्या देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे.

■□■