

वणी समाचार : भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख व लोककल्याणकारी विचारसरणीवर व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा नेतृत्वावर विश्वास ठेऊन GRN कंपनी तरोडाचा कामगारांनी मोठ्या संख्येने भाजपा प्रवेश केले.

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी त्यांच्या गळ्यात भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात मन:पूर्वक स्वागत केले.

यावेळी सुधाकर क्षीरसागर, विठ्ठल गुरनुले, राहुल भोयर, गजानन नांदे, ओमप्रकाश इंगळे, राजू भोगेकार, पांडुरंग देऊरकार, संदीप झाडे, अनिकेत कुंमरे, शंकर कोटनाके, मंगेश वागले, विठ्ठल देऊरकर, रोशन देऊलकर, शुभम मांदाळे, संकेत भादीकर, संदेश तीतर, नथु वैद्य, अमोल तीतरे, अभिषेक लोणारे, आदीनी सहर्ष पक्षात प्रवेश केले.

याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष वणी ग्रामीण प्रदीप जेऊरकर,भाजपा शहराध्यक्ष वणी ॲड निलेश चौधरी, देमल गौरकार व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

■□■









