

निवडणुकीत भाजप सतत का जिंकतो ? रहस्य उघड !
-
२४/७ मोड, जबरदस्त मॅनेजमेंट आणि कार्यकर्त्यांची जिद्द;
-
ईव्हीएम नव्हे, जनतेचा विश्वास!
वणी । २६ डिसेंबर ,२०२५ :
दि. २१ डिसेंबर ला लागलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निकालामध्ये भाजप ला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे काहींच्या मनात प्रत्येक निवडणुकीत भाजपाला एवढे यश कसे मिळते याबद्दल जिज्ञासायुक्त कुतूहल निर्माण होते आहे. काही ठिकाणी असुयाही निर्माण होते आहे. हे यश कसे मिळते याचा अभ्यास नकरता अकलेचे तारे तोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज याच विषयावर चर्चा करूया.
कोणत्याही पक्षाची स्थापना सत्ता मिळविण्यासाठी झालेली असते हा सर्वसाधारण समज आहे. सत्ता सम्पादन करुन ती लोकहितासाठी वापरणे हे खरे राजकीय पक्षाचे ध्येय आसावयास हवे स्वविकास (येथे स्वविकास म्हणजे राजकीय उंची व राजकीय जाण असा घ्यावा ) करीत असताना लोकविकासही दुप्पट वेगाने व क्षमतेने करावयास हवा. लोकविश्वास व जनसमर्थन मिळवणे ज्या पक्षास जमते तो पक्ष राजकीय उंची गाठू शकतो.२०१४ पासून देशाची सर्वोच्च सत्ता हस्तगत करुन सलग तीन निवडणुकीत टिकवणे हे खरोखरीच प्रशसंनीय आहे. हे भाजपाला कस जमलं ते बघूया,
भाजपचा विजय हा वोट चोरी व EVM सेटिंग मूळे होतो हा आरोप नेहमी होतो, निवडणूक आयोग यांनी EVM सेटिंग करुन दाखवा असे आव्हान बरेचदा देऊन झाले पण कुणाला ते शक्य झाले नाही. एकूणच आपले कडील मतदान यंत्रद्वारे घेत असलेली निवडणूक पारदर्शीपणे राबविली जाते. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्रावर उपस्थित मतदान प्रतिनिधीनसमोर डमी मतदान करवून घेऊन ते मतदान त्यांनी दिलेल्या उमेदवाराला जाते की नाही हे बघून मशीन पुन्हा नील करूनच मतदानसाठी सज्ज केली जाते त्यामुळे EVM सेटिंग चा आरोप व कुणालाही मतदान केले तरी भाजपलाच जाते हे म्हणणे चुकीचे ठरते.
आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. भाजपा चा स्ट्राईक रेट इतर पक्षापेक्षा जास्त असल्याची कारणे ही माझ्यामते खालील प्रकारची आहेत.
- भाजपा हा 24/7 इलेक्शन मोडवरच असतो
- भाजपा मूळ विचारधारेशी किंचितही तडजोड करीत नाही.
- जबरदस्त इलेक्शन मॅनेजमेंट.
- तळागाळातील पक्ष कार्यकर्त्याला इलेक्शन मधे सामावून घेणे.
- उपलब्ध नवीन तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करुन घेणे.
- वेगवेगळ्या भागातील विविध समस्यांची माहिती घेऊन त्या समस्या आम्हीच दूर करू शकतो हा विश्वास जनतेत निर्माण करणे.
- प्रखर राष्ट्रभक्ती
- मातृसंस्था रा. स्व संघाची निःस्वार्थ मदत.
आता या प्रत्येक मुद्द्याचा विस्ताराने उहापोह करूया.
आपण २०१४ पासूनचाच विचार केला तर असे लक्षात येते की माननीय पंतप्रधान मोदीजी व मा. गृहमंत्री अमित शहाजी पक्ष संघटनेस सदैव चलित अवस्थेत ठेवतात. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे कार्यक्रम देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करुन घेणे व एक इलेक्शन सम्पल्यावर सुस्तता येऊ न देता पुढील इलेक्शन वर लक्ष केंद्रित करणे.दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे.
भाजपाची मूळ विचारधारा हिंदुत्वाची आहे या विचारधारेशी यतकिंचीतही भाजपा तडजोड करीत नाही त्यामुळे जन मानस भाजपाकडे आपोआप जोडले जाते.
प्रत्येक निवडणुकीत भाजपचे उत्कृष्ट प्रबंधन असते. बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, प्रभाग प्रभारी या द्वारे जास्तीतजास्त मतदा्रांजवळ पक्ष पोहोचवला जातो. प्रत्येक घटक हा आपले नेमून दिलेले काम चोख बजावतो. या यंत्रणावर नगर, तालुका,जिल्हा, प्रदेश यांचे पुर्ण नियंत्रण असते व वेळोवेळी मार्गदर्शन ही मिळते. प्रत्येक भागातील विविध समुदाय यांच्याशीसुद्धा सम्पर्क करुन आपल्या बाजूने वळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करीत असते.
कुठल्याही पक्षाची मोठी सम्पत्ती ही त्यांचा कार्यकर्ता असतो ही सम्पत्ती भाजपा जपतो. कधीकाळी भाजपा कार्यकर्ता असलेला पण काही कारणांनी दूर गेलेल्या कार्यकर्त्यांशी सम्पर्क करुन, त्याला उचित सन्मान देऊन कार्यास लावले जाते.
सध्या SOCIAL MEDIA चे युग आहे. या तंत्रज्ञानाद्वारे कमीतकमी वेळात जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. त्याचा भाजपचा सोशल मीडिया सेल व्यवस्थित वापर करतो व पक्ष उमेदवारांना व पक्ष विचारांना मतदारांपर्यंत खुबीने पोहोचवतो.
समस्या नाही तो माणूस नाही आणि समस्या नाही अशी वस्ती नाही. आपल्या भागातील समस्या सुटावी, चांगले रस्ते असावेत, शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, शिक्षण सुविधा व्हाव्यात, आरोग्य सुविधा व्हाव्यात, रोजगार उपलब्ध व्हावेत व एखाद्यावर अन्याय होत असेल तर पक्षनेता आपल्याला मदत करणारा असावा ह्या अपेक्षा लोकांच्या असतातच या समस्या आम्ही सोडवू शकतो हा विश्वास जनतेला देणे व सत्ता आल्यावर सोडवण्याचा प्रयत्न भाजपा करतो त्यामुळे भाजपाला लोक मते देतात.
भाजपा हा प्रखर राष्ट्रभक्त पक्ष आहे. राष्ट्र प्रथम हा भाजपचा पहिलेपासूनचा नारा आहे. भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगितशिवाय होत नाही, राष्ट्र पुरुशांचा भाजप नेहमीच आदर करतो. “भारत माता की जय” हा नारा प्रत्येक कार्यक्रमात नेत्यांपासून कार्यकर्त्यांनपर्यंत दिलाच जातो त्यामुळे जनतेत भाजपा लोकप्रिय होतो.
भाजपा ची मातृसंघटना रा. स्व. संघ. ही आहे. संघ किंवा भाजपा हे लपवूनही ठेवीत नाही. दोन्हीही सन्घटना स्वतंत्र आहेत कोणीही एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करत नाही पण कार्य मात्र परस्परपूरक, दोघांचाही एकच उद्देश हे “राष्ट्र परमवैभवास नेणे”. संघाजवळ असतात ते निस्वार्थ स्वयंसेवक, हे स्वयंसेवक निवडणुकीत कुठल्याही आदेशाशिवाय, विना अपेक्षेने राष्ट्रकार्य म्हणून सहभागी होतात. अक्षरशः घरचं खाऊन लशकरच्या भाकरी भाजतात ही भाजपची मोठी शक्ती असते. काम सम्पल्यावर पुन्हा अदृश्य होतात कुठे कोणी सांगत सुद्धा नाही की आमच्यामुळे हा निवडून आला.
आपल्याला जसे आपली आई संस्कारीत करीत असते तसेच संस्कार संघानी भाजपावरही केलेले आहेत कारण संघ ही भाजपची मातृसंस्था आहे, भाजपामधील बरीचशी मंडळी संघ स्वयंसेवक असल्यामुळे व्यक्ती विकास व राष्ट्र विकास ही तत्वे भाजपच्या मुळातच आहेत हीच भाजपाची मोठी जमेची बाजू आहे.
निःस्वार्थ व जिद्दीने राष्ट्रकार्यास वाहून घेतलेले मोठ्यासंख्येतील कार्यकर्ते ही भाजपाची मोठी जमेची बाजू आहे. सत्ता सम्पादनानंन्तर भाजपा कडे कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे यातले किती कामाचे आणि किती सत्तेचे लोभी याचा गांभीर्याने भाजपने करावयास पाहिजे. कारण ‘ पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना, सब समाजको लिये साथमे आगे है बढते जाना.’
कुठल्याही झाडाला जुनी पालवी जाऊन नवी पालवी येत असते हा निसर्ग नियम आहे तो राजकीय पक्षालाही लागू होतो त्या मूळे नवीन कार्यकर्त्यांची फळी उभी करावीच लागते पण जुन्यांना विसरू नये कारण जुनं ते सोन असतं
काही कार्यकर्ते मी माझा परिवार, माझा माणूस, माझा समाज असा विचार करणारी असतात. तिकीट वाटपातसुद्धा अशी मंडळी अनावश्यक हस्तक्षेप करतात व तोंडावर आपटतात पण या मूळे पक्षाला नुकसान होते अशा लोकांपासून भाजपने वेळीच सावध झालेले बरे. एकूण सद्या परिस्थितीत उत्तम परफार्मन्स.
आपल्या सुचना, संदेश, लेख, बात्मी, प्रेस नोट आम्हाला पाठवा, आम्ही योग्य व्यासपीठ देऊ!
- मो/व्हॉट्सअप : 9021203010
- ईमेल : WaniSamachar1@gmail.com, editor@WaniSamachar.Com.
www.WaniSamachar.com










