

“गोष्ट एका सहृदयी मित्राच्या राजकीय अपरिपक्वतेची “
- वणी । दि.२७/१२/२०२५ :
काल वणी समाचार व्हॉट्सअप ग्रुपवर एका पत्रकाराने लिहिलेली एक पोस्ट वाचनात आली की अमुक अमुक निर्वाचित नगरसेवक हे विशिष्ट समुदायायचे प्रतिनिधित्व करतात म्हणून त्यांची वर्णी वणी नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदी लागावी असे वर्णन होते. कदाचित ही बातमी त्या सन्माननीय पत्रकारांचे स्वतःचे क्रीयेशन असेल तो त्यांचा एक पत्रकार म्हणून अधिकार आहे त्यामुळे त्या बातमीस कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही पण ज्यांनी ही पोस्ट वणी समाचार ग्रुपवर पोस्ट केली त्यावरून मला राष्ट्रीय राजकारणात घडलेली व दुरगामी परिणाम करुन गेलेली घटना आठवली.
त्याचे असे झाले की माजी पंतप्रधान मा. स्व. राजीवजी गांधी यांच्या हत्येनंन्तर जी राष्ट्रीय निवडणूक झाली त्यावेळी कुणाला पंतप्रधान करायचे यावर काँग्रेस पक्षामध्ये खल सुरु झाला पर्यायाने पुढील पंतप्रधानाचा शोध सुरु झाला. त्यात तीन नावे आघाडीवर होती. 1) पि. व्ही. नरसिंहराव, 2) राजेश पायलट, 3) शरद पवार.
त्यावेळी पुण्याचे खासदार व काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते मा. सुरेश कलमाडी हे शरद पवारांसाठी लॉबींग करायला लागले त्यांनी लागलीच शरद पवारांसाठी सह्यांची मोहीम सुरु केली व मीडिया मध्येही बातम्या लावल्या त्याचा परिणाम असा झाला की एका सुप्रभाती केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे मोठे नेते करूणाकरण यांनी आपला पाठिम्बा नरसिंहराव यांना घोषित केला. हळूहळू तत्कालीन काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांचीच री ओढली व बहुसंख्य प्रदेश अध्यक्षानीही नरसिंहराव यांनाच पाठिंबा दर्शवला. याचा व्हायचा तोच परिणाम झाला जगदीश पायलट यांनी आपले नाव शर्यतीतून मागे घेतले मग उरले ते आपले शरद पवार साहेब. त्यांनीही एकूण रागरंग पाहून दिल्ली विमानतळावरच भेटलेल्या पत्रकारांना उत्तरे देताना स्पष्ट केले की “मी कधीच पंतप्रधानाचा उमेदवार नव्हतो “. मग पुढे एकच नाव उरल्यामुळे नरसिंहराव पंतप्रधान झाले. अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे आपण आपला मराठी माणूस पंतप्रधान होण्यापासून वंचीत ठेवला तो आजपर्यंत.
कुठल्याही राजकीय पक्षामध्ये लॉबींग महत्वाचे असते पण त्या त्या राजकीय पक्षाची कार्यपद्धती पाहून सुजाणपणे, योग्य व्यसपीठावर करायची असते त्यासाठी मीडिया हे साधन नव्हे.
आपल्या अतीव प्रेमापोटी कुणाचे नुकसान होऊ नये. एखाद्याचे राजकीय जीवन सुरु होताच सम्पणे व त्यासाठी आपली माणसेच कारणीभूत होणे हे चांगले नाही.
उल्लेखीत निर्वाचित नगरसेवक हे मनमिळावू स्वभावाचे, परिश्रमि उद्योजक आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या परिवारातून ते आलेले आहेत. त्यांच्या प्रतिष्ठानामधे येणारे ग्राहक एकाच समुदायाचे नसून सर्वच आहेत ते सर्व ग्राहकांशी प्रेमानेच वागतात त्यामुळे त्यांना एका समाजापूरते मर्यादित न करता सर्वसमावेशक समजावे.
खरं म्हणजे कुणाला उपाध्यक्ष करायचे हा भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे. भाजप हा पक्ष एका विशिष्ट चाकोरितून चालतो सुदैवानी राजकीय गणिताचे जाण असणारे नेते भाजपामध्ये भरपूर आहेत. योग्यवेळी ते योग्य निर्णय घेतीलच.
राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या व्यक्तीने मिळालेल्या संधीच सोन करायच असतं अमुक मिळालं नाही म्हणून खन्त न करता मिळालेल्या संधीतून आपली चुणूक दाखवायची असते. मा. नरेंद्र मोदीजी व मा. देवेंद्र फडणवीसजी ही त्यातीलच उत्तम उदाहरणे आहेत. बाकी सुज्ञास सांगणे न लगे.
www.WaniSamachar.com










