

● वणी न.प. निवडणूक २०२५ ●
प्रभाग ११ मध्ये भाजपची प्रचारात आघाडी, दिसतेय कमळाचीच ‘हवा’!
▪︎रेखाताई-लवलेश-विद्याताईंना घराघरातून हिरवी झेंडी; “आता फक्त भाजपच” असा जनतेचा सूर.
वणी । दि. २८ नोव्हेंबर २०२५ :

प्रभाग ११ मध्ये सध्या कमळाचीच चर्चा आहे! भाजपचे अधिकृत उमेदवार सौ. रेखा विलासराव कोवे, श्री. लवलेश किसनलाल लाल आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचाराला जनतेने इतका उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे की, आता इथे दुसऱ्या पक्षाचा नंबरही लागत नाही.
चहाच्या टपरीपासून ते दुकानांच्या ओट्यापर्यंत एकच बोललं जातंय – “रेखाताई-लवलेश-विद्याताई आल्यावर प्रभाग खऱ्या अर्थाने बदलणार!”

महिलांनी तर ठामपणे सांगितलं, “आमच्या मुली-बहिणींसाठी, स्वच्छतेसाठी, सुरक्षेसाठी आता फक्त विद्याताईंवर विश्वास आहे.” युवक लवलेश लाल यांना “भाऊ, आमच्या रोजगाराचा प्रश्न तुम्हीच सोडवणार” म्हणत मिठी मारतायत.
माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुकर, श्रीकांत पोटदुखे, संदीप मदान आणि भाजपचे सर्व स्तरांतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते रात्रंदिवस राबत आहेत.
एका दुकानदाराने सांगितलं, “आता प्रभाग ११ ची सीट भाजपची पक्की! बाकीचे फक्त फिरतायत, इथे तर कमळ आधीच फुललंय!”
प्रभाग ११ मधून मिळालेल्या या प्रचंड जनादेशाने भाजपची नगरपरिषदेवर सत्ता येण्याची खात्रीच झाली आहे.










