प्रभाग ५ – कमळावरच जनतेचा विश्वास दिसतोय ..

1175
   वणी न. प. निवडणूक २०२५   

“प्रभाग ५ : सोनाली-रितिक-विद्याताईंच्या रॅलीत जनसागर !”

▪︎माजी आमदार बोदकुरवारांच्या नेतृत्वात भव्य रॅली..


वणी, दि. २५ नोव्हेंबर २०२५

प्रभाग क्रमांक ५ आज कमळाच्या रंगाने रंगला! भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्याताई खेमराज आत्राम, प्रभाग ५ (अ) च्या उमेदवार सौ. सोनाली प्रशांत निमकर आणि प्रभाग ५ (ब) चे उमेदवार रितिक लक्ष्मण मामिडवार यांच्या प्रचारार्थ माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात व माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभागात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.

ढोल-ताशे, कमळाचे झेंडे आणि “भाजपला मतदान करा, वणीला नंबर वन करा” अशा घोषणांनी संपूर्ण प्रभाग दणाणला.

यावेळी भाजपा प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, शहराध्यक्ष ॲड. नीलेश चौधरी, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्रेयस हरणे, शहर उपाध्यक्ष विलास निमकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. प्रभागातील जनतेने उमेदवारांचे थाटात स्वागत केले आणि आशीर्वाद दिला. सोनाली निमकररितिक मामिडवार व विद्याताई आत्राम यांचावर तर प्रत्येक गल्लीतून प्रेमाचा वर्षावच झाला.

मा.आ. संजिवरेड्डी बोदकुरवार म्हणाले, “प्रभाग ५ मधील जनतेच्या डोळ्यातील विश्वास पाहून आमचा सर्वांगीण विकासाचा संकल्प आणखी दृढ झाला. आज जनतेने दाखवलेले प्रेमच आमचे खरे बळ आहे. येथे कमळ तर फुलणारच, पण घवघवीत फुलणार!”

तारेंद्र बोर्डे यांनी जनतेला आश्वासन दिले, “प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे. तुमचा हा विश्वास आम्हाला नवी ऊर्जा देत आहे.”

प्रभाग ५ मधील हा प्रचंड उत्साह पाहता कमळाची विजयी माळ इथे निश्चितच गळ्यात पडणार, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.


www.WaniSamachar.com