

वणी न.प.निवडणूक-2025
“प्रभाग ७ मध्ये जनसागर, कमळावर विश्वासाचा महासागर !”
▪︎बोदकुरवारांच्या नेतृत्वात रॅलीचा धडाका, जनतेने उषाताई-नितीन-विद्याताईंना दिला भरभरून आशीर्वाद.
वणी । दि. २६ नोव्हेंबर २०२५ :

प्रभाग क्रमांक ७ आज कमळाच्या झेंड्याखाली एकसंघ झाला ! नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत भाजप उमेदवार सौ. विद्याताई खेमराज आत्राम, प्रभाग ७ (अ) च्या उमेदवार सौ. उषाताई नथुजी डुकरे आणि प्रभाग ७ (ब) चे उमेदवार श्री. नितीन गोपालराव धाबेकर यांच्या प्रचारासाठी माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः धुरा सांभाळली. सकाळी सुरू झालेली ही भव्य रॅली संपूर्ण प्रभागातून फिरली आणि जनतेच्या प्रेमाला उधाण आले.
यावेळेस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुकर, शहराध्यक्ष ॲड. नीलेश चौधरी, जिल्हा सोशल मीडिया संयोजक दीपक पाऊणकर, शालिक उरकुडे, अनुराग काठेड, मनीष गायकवाड, मनोज उरकुडे, प्रमोद क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. फटाके, ढोल-ताशे आणि “कमळ फुलवा, वणी बदलवा”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.

प्रभागातील नागरिकांनी घराच्या दारातच उभे राहून उमेदवारांचे स्वागत केले. उषाताई डुकरे यांना महिलांनी गळ्यात हार घातले, नितीन धाबेकर यांना युवकांनी खांद्यावर घेतले, तर विद्याताई आत्राम यांच्याभोवती प्रेमाचा खच पडला. एका ज्येष्ठ नागरिकाने हात जोडून म्हटले, “तुम्ही येताच आम्हाला विश्वास वाटतोय.”
मा.आ. संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले, “प्रभाग ७ चा हा उत्साह सांगतोय की येथे कमळ नाही फुलणार, तर घवघवीत फुलणार! विद्याताई, उषाताई आणि नितीन यांच्या जोडीलाच प्रभागाची प्रगती आहे.”
विद्याताई आत्राम यांनी जनतेला सांगितले, “तुमचा हा प्रेमाचा ओघ आम्हाला दिवसरात्र काम करण्याची ताकद देतो. प्रभाग ७ ची प्रत्येक समस्या आम्ही प्राधान्याने सोडवू.”
“प्रभाग ७ मधील हा प्रचंड जनस्पंदन पाहता कमळाचा विजय आता निश्चित मानला जातोय.” असे एक मतदारांने व्यक्त केले.

www.WaniSamachar.com









