प्रभाग ११ मध्ये कमळाची प्रचंड लाट दिसतेय.

380
    वणी न. प. निवडणूक २०२५    
प्रभाग ११ मध्ये कमळाची प्रचंड लाट दिसतेय.
  • माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात भाजपाचा जोरदार प्रचार, मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद

वणी । दि. २० नोव्हेंबर २०२५ :

यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगर परिषद निवडणुकीत भाजपाने कमालीची ताकद दाखवली आहे. आज प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवारांसाठी माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात प्रचाराचा धडाका सुरू झाला. नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रचार रॅलीला व प्रभागातील घराघरांत झालेल्या संपर्काला मतदारांचा उतुंग व उत्साही प्रतिसाद मिळाला.

प्रभाग ११ (अ) च्या अधिकृत उमेदवार सौ. रेखा विलासराव कोवे व प्रभाग ११ (ब) चे उमेदवार लवलेश किशनलाल लाल यांनी कार्यकर्त्यांसह रस्तोरस्ता फिरून मतदारांशी थेट संवाद साधला. “वणीचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे. विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वात वणीला नवी उभारी मिळेल,” असे संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.

प्रचारादरम्यान भाजप जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, वणी शहराध्यक्ष ॲड. नीलेश चौधरी, सरचिटणीस हितेश अटारा, शहर उपाध्यक्ष मनोज सरमुकदमसत्यजित ठाकुरवार,भाजप व्यापारी आघाडीचे संदिप मदान व  नितीन बिहारी, कपील जुनेजा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभागातील महिलांनी सौ. रेखा कोवे यांचे स्वागत केले, तर युवकांनी लवलेश लाल यांना विजयी शुभेच्छा दिल्या. प्रचारादरम्यान “मोदींच्या विकासाला साथ द्या, विद्याताईंना नगराध्यक्षा करा” अशा घोषणांनी वातावरण ढवळून निघाले.

“प्रभाग ११ मधला हा प्रचंड उत्साह पाहता कमळाचीच लाट येणार, वणी नगरपरिषद भाजपाचीच होणार,” असे भाजप शहराध्यक्ष अँड नीलेश चौधरी यांनी व्यक्त केला. मतदारही “यावेळेस पुन्हे… कमळावर बटन दाबायचंय!” असे ठामपणे बोलताना दिसले.

वणीचा विकास आणि सुजलाम् सुफलाम् वणीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. प्रभाग ११ मधून कमळ फुलणार हे निश्चित दिसतंय! 🙏 आता फक्त एकच हाक – कमळावर बटन दाबा, वणीचा विकास पक्का!


 www.WaniSamachar.com