

◇ वणी न.प निवडणूक- २०२५ ◇
•• मतदार जागृती अभियान ••
११ दिवसांची विशेष मालिका
भाग २ : मतदान का करायचे? लोकशाहीचे मर्म काय आहे?
वणी । दि. २२/११/२०२५ :
टीम www.WaniSamachar.com तर्फे सर्व मतदार बंधू-भगिनींना सादर नमस्कार !
एका बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस मेहनत घेऊन संविधान लिहिले. दुसऱ्या बाजूला लाखो क्रांतिकारकांनी फासावर लटकताना, गोळ्या खाताना स्वप्न पाहिले की येणाऱ्या पिढ्या मतदान करून चांगले नेते निवडतील.
आज जगात ५० पेक्षा जास्त देश असे आहेत जिथे लोकांना मतदानाचा अधिकारच नाही. तिथे बंदुकीच्या भीतीने निवडणुका होतात. आपल्याकडे मात्र आपण स्वतःच घरी बसून लोकशाहीला कमकुवत करतो.

मतदान म्हणजे फक्त एक क्रॉस नाही, ते म्हणजे आपल्या मुला-मुलींसाठी चांगली शाळा, चांगले रुग्णालय, स्वच्छ पाणी, सुरक्षित रस्ते, रोजगार, स्टार्टअपसाठी मदत – साऱ्याची हमी आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्याकडे आहे, ती जपायची की सोडून द्यायची?
तुमचे एक मत ठरवते की पुढची पाच वर्षे तुम्ही सुखाने जगणार की रोज रडणार.
कोणत्याही अमिषाला, भुलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडा, व स्वतःचे, वार्डाचे, शहराचे भविष्य सुरक्षित करा.

टीम WaniSamachar.com चे दुसरे आवाहन;
” मतदान केले नाही तर तक्रार करण्याचा नैतिक अधिकारही राहणार नाही ! “
मतदार राजा जागा हो, लोकशाही चा धागा हो
□ वाचण्याकरीता खाली Click करा :
www.WaniSamachar.com









