अनुराग काठेड यांची चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचा सह-समन्वयक पदी नियुक्ती..

342

अनुराग काठेड यांची “देवाभाऊ फाउंडेशन” चा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचा सह-समन्वयक पदी नियुक्ती..


वणी । १ नोव्हेंबर २०२५ :

देवाभाऊ फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य समन्वयक श्री.गजानन जोशी यांनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी अनुराग काठेड जैन यांची चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचा सह-समन्वयक पदी नियुक्ती केली. यावेळी त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

देवाभाऊ फाउंडेशन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरणीय क्षेत्रात सक्रिय कार्य करणारी संस्था असून, या नियुक्तीमुळे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील विविध उपक्रमांना गती मिळेल, असा विश्वास श्री. जोशी यांनी व्यक्त केला. अनुराग काठेड जैन हे या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

नियुक्ती सोहळा साध्या पद्धतीने पार पडला असून, फाउंडेशनच्या माध्यमातून क्षेत्रीय विकास आणि जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात यावे, ही अपेक्षा.


■□■