

वणी | २ नोव्हेंबर २०२५ :
अखेर बातमी आली ! राज्य निवडणूक आयोग पुढच्या आठवड्यात –अंदाजे सोमवारी किंवा मंगळवारी – २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करु शकते. आणि हो, फक्त २१ दिवसांत सगळी प्रक्रिया – नामांकन, प्रचार, मतदान, निकाल – पूर्ण होणार ! नोव्हेंबरमध्येच मतदान, दुसऱ्याच दिवशी मतमोजणी.

● निवडणुका तीन टप्प्यात :
-
पहिला टप्पा → नगरपालिका + नगरपंचायत (नोव्हेंबर)
-
दुसरा टप्पा → जिल्हा परिषद + पंचायत समिती (डिसेंबर)
-
तिसरा टप्पा → मुंबईसह २९ महापालिका (१५-२० जानेवारी २०२६)
घोषणा होताच आचारसंहिता लागू, राजकारण्यांचे ‘उद्घाटन’ आणि ‘भूमिपूजन’ थांबणार!
● पूरग्रस्त भागामुळे क्रम बदलला :
सध्या ग्रामीण भागात अतिवृष्टी-पूरमुळे मदतकार्य जोरात. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, “जिल्हा परिषद निवडणुका लगेच शक्य नाहीत.” म्हणून नगरपालिका आधी, जिल्हा परिषद नंतर.
● सर्वोच्च न्यायालयाची डेडलाइन :
-
३१ जानेवारी २०२६ पर्यंत सगळ्या निवडणुका पूर्ण करायच्या.
-
म्हणून महापालिका निवडणुका १० दिवस आधी, म्हणजे २० जानेवारीपर्यंत संपणार.

● ईव्हीएमची चिंता संपली !
ईव्हीएम कमी पडणार म्हणून आयोगाने:
-
मध्य प्रदेश सरकारकडून करार
-
५० हजार नवीन ईव्हीएम खरेदी (ECIL कडून)
-
भारत निवडणूक आयोगाकडूनही मदत मागितली
प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण – सगळं तयार ! आता फक्त निवडणूकीचा घंटा वाजायचा बाकी !

www.WaniSamachar.com
■□■








