

वणी । १ नोव्हेंबर २०२५ :
भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चौहान यांच्या सूचनेनुसार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुरज गुप्ता यांनी पार्थ त्रिवेदी यांची भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सोशल मीडिया सेलचा, जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्ती केली आहे.
यवतमाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी पार्थ त्रिवेदी यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नियुक्तीप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चौहान, जिल्हा सरचिटणीस राजुभाऊ पडगीलवार, जिल्हा उपाध्यक्ष कुणालजी चोरडीया, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुरजजी गुप्ता यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ही नियुक्ती भाजयुमोच्या सोशल मीडिया विभागाला अधिक गतिमान आणि प्रभावी बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पार्थ त्रिवेदी हे पक्षाच्या युवा शाखेत सक्रिय असून, सोशल मीडिया क्षेत्रातील त्यांच्या कौशल्याचा उपयोग पक्षाच्या प्रचार आणि जनसंपर्कासाठी होणार असल्याचे भाजयुमो नेत्यांनी सांगितले.
■□■










