वणी नगरपरिषदेत ऐतिहासिक पदग्रहण: विद्याताई आत्राम नगराध्यक्ष; उपाध्यक्षपदी राकेश बुग्गेवार, तीन नामनिर्देशित सदस्यांची यादी जाहीर !

1318

वणी नगरपरिषदेत ऐतिहासिक पदग्रहण

▪︎विद्याताई आत्राम नगराध्यक्ष;

▪︎उपाध्यक्ष पदी राकेश बुग्गेवार,

▪︎तीन नामनिर्देशित सदस्यांची यादी जाहीर !


वणी (यवतमाळ) । दि. १२ जानेवारी २०२६ :

वणी नगरपरिषदेच्या महिला नगराध्यक्ष म्हणून सौ. विद्याताई खेमराज आत्राम यांनी आज पदग्रहण केले. राजामाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून झालेल्या या भव्य समारंभात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. अशोक ऊईके, भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान, माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, नितीन भुतडा, तारेंद्र बोर्डे, शहर भाजप अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला.सकाळी जैताई मातेचे दर्शन घेऊन विद्याताई आत्राम यांनी भव्य रॅलीने नगरपरिषद परिसरात प्रवेश केला. या रॅलीत १८ नगरसेवक, स्थानिक भाजप नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.नगर परिषद परीसरात रॅलीचे रूपांतर सभेत झाल्यानंतर ना.अशोक ऊईके, प्रफुल्ल चौहान, संजिवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे आणि विद्याताई आत्राम यांनी सभेला संबोधित केले. यावेळी भविष्यातील विकास आराखडा मांडण्यात आला. विशेष म्हणजे, महिला शक्तीचा सन्मान म्हणून नगरपरिषदेच्या सर्व महिला स्वच्छताकर्मी, शाळेतील महिला शिक्षक आणि महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते साडी देऊन सत्कार करण्यात आला.

पदग्रहणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी पहिल्या अडीच वर्षांसाठी उपाध्यक्षपदी भाजपचे गटनेते राकेश बुग्गेवार यांची निवड जाहीर केली. यानंतर नामनिर्देशित सदस्यांच्या यादीची घोषणा झाली. उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळाच्या आधारे भाजपला दोन आणि शिवसेना (उबाठा)ला एक जागा मिळाली आहे.

● नामनिर्देशित सदस्यांची यादी खालीलप्रमाणे:

  • भाजप: किशनलाल छगनलाल खुंगर आणि रविंद्र सदाशिव बेलूरकर
  • शिवसेना (उबाठा): शत्रुघ्न मारोती मालेकार

या नियुक्तीमुळे नगरपरिषदेच्या सभागृहात भाजपचे संख्याबळ अधिक मजबूत होणार असून, शहर विकासाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली वणी नगरपरिषद नव्या उंची गाठेल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला.


www.WaniSamachar.com