प्रभाग क्र. १४ (क) मध्ये भाजपचा जोरदार प्रचार, भाजपचा अर्चना शंकर झिलपे यांना प्रचंड विजयाची अपेक्षा !

731

● वणी न.प. निवडणूक, २०२५ ●

प्रभाग क्र. १४ (क) मध्ये भाजपचा जोरदार प्रचार, भाजपचा अर्चना शंकर झिलपे यांना प्रचंड विजयाची अपेक्षा

▪︎बोदकुरवार, बोर्डे, चौधरी यांचे थेट आवाहन; “जनतेच्या विकासासाठी कमळ फुलवा, उद्या शनिवारला सकाळी ७.३० ते दुपारी ५.३० पर्यंत मतदान”


वणी, दि. १९ डिसेंबर २०२५ :

वणी नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ (क) जागेसाठी न्यायालयीन अपील निकालानंतर नव्याने प्रक्रिया सुरू झाली असून, भारतीय जनता पक्षाने येथे जोरदार प्रचार केला आहे.भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चना शंकर झिलपे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे ठाम आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पर्यंत हे तिघेही नेते प्रभाग १४ मधील प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक आणि प्रत्येक घरात फिरत आहेत. सकाळी १० वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत जनसंपर्क करत त्यांनी मतदारांना कमळाच्या बटनाला दाबण्याची विनंती केली. “ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी, मी लढेल फक्त जनतेच्या विकासासाठी” हे अर्चना शंकर झिलपे यांचे घोषवाक्य प्रचारात गाजले असून, त्यांनी प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

“प्रभाग १४ (क) मध्ये कमळ प्रचंड मतांनी फुलले तरच विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष म्हणून मजबूत हात मिळेल. या भागातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रश्न तातडीने मार्गी लागतील,” असे ठाम प्रतिपादन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले.

माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे महिलांना आवाहन करताना म्हणाले, “अर्चना शंकर झिलपे या तरुण व सक्षम उमेदवार आहेत. त्यांना निवडून द्या, प्रभागात महिला बचत गटांसाठी विशेष निधी व योजना आणू.”

शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी तरुणांना सांगितले, “अर्चना शंकर झिलपे हे प्रभागातील विश्वासू चेहरा आहेत. त्यांना साथ द्या तर येथील तरुणांना रोजगार, कौशल्य केंद्र आणि स्टार्टअपसाठी थेट मदत मिळेल.”

उद्या शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रभाग १४ (क) च्या मतदारांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून सौ अर्चना शंकर झिलपे यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यावे, अशी जोरदार विनंती भाजपने केली आहे.


www.WaniSamachar.com