वणीत प्रभाग १४ (क) साठी २० डिसेंबरला मतदान, त्रिकोणी लढत रंगतदार

871
● वणी नगरपरिषद निवडणूक, २०२५ ●

वणीत प्रभाग १४ (क) साठी २० डिसेंबरला मतदान, त्रिकोणी लढत रंगतदार !

▪︎२१ डिसेंबर ला सर्व १४ प्रभागाचा २९ नगरसेवक व १ नगराध्यक्ष पदाचा अशा एकूण ३० जागेचे निकाल.


वणी । दि. १७ डिसेंबर, २०२५ :

वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ ची ‘क’ जागा प्रलंबित राहिल्यानंतर आता या एकमेव जागेसाठी दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.

यापूर्वी ‘अ’ आणि ‘ब’ जागांवर २ डिसेंबरला मतदान झाले होते. आता उर्वरित ‘क’ जागेची निवडणूक पूर्ण होताच नगरपरिषदेचा पूर्ण निकाल जाहीर होईल.

या प्रभागातील त्रिकोणी लढत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. प्रमुख उमेदवार खालीलप्रमाणे :

  • अर्चना शंकरराव झिलपे (भारतीय जनता पार्टी )
  • हिना अहेमद शकील (शिवसेना – शिंदे गट)
  • माया मारोती ढूरके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट)

सर्व प्रमुख पक्षांनी या एकमेव जागेवर पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या तीन पक्षांमध्ये थेट लढत असल्याने प्रचार यंत्रणा जोरात सुरू आहे. उमेदवार आणि कार्यकर्ते घरटी फिरून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

महाविकास आघाडी (मविआ) अंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांचा या जागेवर स्वतंत्र उमेदवार नसल्याने त्यांचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला मिळेल किंवा ते तटस्थ राहतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मविआच्या भूमिकेमुळे निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो.

वणीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, मतदानानंतर दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे केवळ वणीच नव्हे तर परिसरातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.


(▪︎संदर्भ : यापूर्वीचा अहवाल – वणी नगरपरिषद निवडणुकीत महत्त्वपूर्ण बदल : प्रभाग क्र. १४ ची ‘क’ जागा पुढे ढकलली, ‘अ’ आणि ‘ब’ वर २ डिसेंबरलाच मतदान https://wanisamachar.com/2025/12/01/2185/)



www.WaniSamachar.com