

महसूल विभागात डिजिटल क्रांती !
▪︎७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे आता कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे वैध,
▪︎फक्त १५ रुपयांत मिळणार अधिकृत डिजिटल प्रत.
मुंबई । दि.४ डिसेंबर :
महाराष्ट्र शासनाने आज एक ऐतिहासिक निर्णय घेत डिजिटल स्वाक्षरी, क्यूआर कोड आणि १६ अंकी पडताळणी क्रमांक असलेले ७/१२, ८-अ तसेच फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे वैध ठरवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे तलाठ्याची प्रत्यक्ष सही व शिक्का यांची गरज कायमची संपुष्टात आली आहे.
आता केवळ १५ रुपये शुल्क भरून नागरिक महसूल विभागाच्या https://bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावरून किंवा महाऊर्जा ॲपवरून डिजिटल उतारा डाउनलोड करू शकतील. हे डिजिटल उतारे सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालये, बँका, सहकारी संस्था तसेच न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे ग्राह्य धरले जातील.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत आनंद व्यक्त करताना सांगितले की, हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य जनतेसाठी मोठी सुटका ठरेल. पारदर्शकता, वेग आणि सोय यांचा नवा अध्याय या निर्णयाने सुरू झाला असून, डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे.
राज्यातील लाखो नागरिकांना आता गाव पातळीवर तलाठी-मंडी फिरण्याची व सही-शिक्क्यासाठी वाट पाहण्याची वेळ संपली आहे. हा निर्णय तात्काळ लागू झाला असून, नागरिकांनी डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहवान शासनाने केले आहे.
www.WaniSamachar.com










