वणीत काँग्रेस–राष्ट्रवादी (श.प.) एकत्र, शिवसेना (उबाठा) बाबत संभ्रम…

951

वणी । 29 ऑक्टोबर :

वणीत आगामी नगर परिषद निवडणुकीची सर्व प्रमुख पक्ष आणी इच्छुक उमेदवारांकडुन जोरदार तयारी सुरू आहे.

अशातच बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी वणीचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगर परिषदेची निवडणूक एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रवादी (श.प.) कडून नगराध्यक्ष पदावर दावा करण्यात आला, पण सध्या हा प्रस्ताव विचारात असल्याचे समजते.

बैठकी संदर्भात महिती देताना मा.आ.वामनराव कासावार म्हणाले की, महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी वणीचे आ.सजय देरकर यांच्याशी चर्चा करून, शिवसेना (उबाठा) ला महाविकास आघाडीत सामील करण्याचे प्रयत्न करणार. तसेच या आघाडीत वंचित बहुजन आघाडीला देखील सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरु आहे.

बैठकीस काँग्रेस पक्षातर्फे मा.आ.वामनराव कासावार, आशिष खूलसंगे, घनश्याम पावडे, डॉ. महेंद्र लोढा, राजीव कासावार, इजहार शेख, दिलीप मालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाकडून रज्जाक पठाण, आबिद हुसेन, दिलीप भोयर, राजू वांढरे, विनोद ठेंगणे, संदीप खोब्रागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

■□■