भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, वणी शहर कार्यकारिणी घोषित — तरुणांचा मोठ्या संख्येने पक्षप्रवेश

814

वणी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वणी शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यक्रमात शहरातील अनेक तरुणांनी मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

कार्यक्रमाला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया, शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, तसेच भाजपा सोशल मीडिया सेल यवतमाळ जिल्हा संयोजक दिपक पाऊणकर, भाजपा जिल्हा सदस्य अरुण कावडकर,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रज्वल ठेंगणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

शहरातील विविध प्रभागांतील तरुणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष बालाजी भेदोडकर यांच्या स्वाक्षरीने नवीन कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी नियुक्त सदस्यांना दिलेल्या संदेशात असे नमूद करण्यात आले की — “आपली नियुक्ती ही आपल्या राजकीय, सामाजिक तसेच सर्वांगीण कार्याची पावती आहे. पक्षाप्रती निष्ठा आणि समर्पणाची जाणीव ठेवून आपण पक्ष संघटनेच्या वाढीसाठी बळकटी द्याल व पक्षाचे ध्येय-धोरण घराघरात पोहोचवाल,” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमामुळे वणी शहरातील भाजप युवा मोर्चाला नवे नेतृत्व आणि नवउत्साह लाभल्याची प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

■□■