● प्रभाग १० मध्ये बोदकुरवारांच्या नेतृत्वात कमळाचा दणदणीत शक्तीप्रदर्शन..

448
● वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ ●

प्रभाग १० मध्ये बोदकुरवारांच्या नेतृत्वात कमळाचा दणदणीत शक्तीप्रदर्शन..

  • चि.विरांश याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


वणी (यवतमाळ) । २७/११/२०२५ :

वणी नगरपरिषद सार्वजनिक निवडणुकीच्या धामधुमीत आज प्रभाग क्रमांक १० मध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चौक ते मुख्य बाजारपेठ अशा संपूर्ण परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आणि रस्त्याच्या दुतर्फा कमळाच्या निशाण्यांनी वातावरण भारावून टाकले.

रॅलीत मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी रोशन कटारीया व सौ.प्रियंका रोशन कटारीया यांनी मा.आ. बोदकुरवार, नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार विद्याताई आत्राम तसेच इतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन औक्षण करून स्वागत केले.

▪︎प्रभाग १० चे अधिकृत उमेदवार :

  • प्रभाग १०-अ : सौ. आरती गिरीष वांढरे प्रत्येक घराला आपले घर समजणाऱ्या, शांत स्वभावाच्या पण कामात तडफदार असलेल्या आरतीताईंनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील महिलांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या व तरुणांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी धावपळ केली आहे.
  • प्रभाग १०-ब : श्री. अनिल लाभचंदजी चिंडालिया जमिनीवरचे नेते म्हणून ओळखले जाणारे अनिलभा प्रभागातील प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येला आपलीच समस्या मानून तत्परतेने धावून जातात.

▪︎विशेष आकर्षण :

▪︎प्रमुख उपस्थिती :

या भव्य रॅलीत

भाजपा प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष मा. दिनकर पावडे, भाजपा शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, माजी शहराध्यक्ष मा. श्रीकांत पोटदुखे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक दीपक पाऊणकर , अरूण कावडकर, अशोक भंडारी, विजय गेलडा, गिरीष राठी, आशिष सिसोदिया, मयूर गोयनका, संदिप मदान, कपील जुनेजा, अनुराग काठेडनिकीत झामड,, मुकुल खिवंसरा, कपील जुनेजा, संतोष भेले, आशिष खिवंसरा, कुशाग्र खिवंसरा, व इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच भाजपा पदाधिकारी, युवक आघाडी, महिला आघाडी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मा. बोदकुरवार यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले, “वणीचा विकास हा आमचा संकल्प आहे. प्रभाग १० मधील पाणीप्रश्न, रस्ते, स्वच्छता, पथदिवे, आरोग्य सुविधा यावर आम्ही आत्तापर्यंत जे काम केले ते सर्वांना माहिती आहे. आता विद्याताई आत्राम नगराध्यक्ष म्हणून व आरतीताई- अनिलभाऊ नगरसेवक म्हणून आल्यावर हा विकास दुप्पट वेगाने होईल. जनतेच्या आशीर्वादाने प्रभाग १० चा कायापालट करायचाच आहे.”

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांनी उपस्थित नागरिकांना आश्वासन दिले की, “मी जर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर प्रभाग १० ला प्राधान्य देऊन इथले सर्व रखडलेले प्रश्न मार्गी लावेन.”

▪︎जनतेला आवाहन :

मान्यवरांनी आवाहन केले की “आपल्या अमूल्य मताची मोहर कमळ चिन्हावर उमटवा. विकासाला, सुशासनाला आणि प्रभाग १० च्या सर्वांगीण प्रगतीला पाठबळ द्या.”


टीम www.WaniSamachar.com  सर्व मतदारांना आवाहन करते;

“कोणत्याही अमिषाला, भुलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला मत द्या आणि प्रभागाचे, वणीचे भविष्य सुरक्षित करा!”


जय हिंद! जय महाराष्ट्र!


www.WaniSamachar.com