

◇ वणी न.प निवडणूक- २०२५ ◇
•• मतदार जागृती अभियान ••
११ दिवसांची विशेष मालिका
भाग ५ : मतदान हे माझे पहिले कर्तव्य का?
वणी । दि.२५/११/२०२५ :
टीम www.WaniSamachar.com तर्फे सर्व मतदार बंधू-भगिनींना सादर नमस्कार !
- भारताचे संविधान कलम ५१A (मौलिक कर्तव्य) स्पष्ट सांगते – “प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे की तो भारतीय संविधानाचे पालन करेल आणि मतदान करेल.” सीमेवर सैनिक -३० डिग्री थंडीत, डास-मच्छरांच्या त्रासात गोळ्या खातात म्हणून आपण घरी आरामात झोपू शकतो.

भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू यांनी फासावर चढताना हसत हसत शेवटची इच्छा व्यक्त केली होती – “आम्ही मरतोय पण येणाऱ्या पिढ्या स्वतंत्र भारतात मतदान करतील.” आपण घरी बसलो तर त्यांचा बलिदान व्यर्थ ठरेल. मतदान न करणे म्हणजे स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा आणि बलिदानाचा अपमान आहे!

कोणत्याही अमिषाला, भुलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडा, व स्वतःचे, वार्डाचे, शहराचे भविष्य सुरक्षित करा.

टीम www.WaniSamachar.com चे पाचवे आवाहन,
“सैनिक सीमेवर लढतात, आपण मतदान केंद्रावर लढूया !”
www.WaniSamachar.com









