

◇ वणी न.प निवडणूक- २०२५ ◇
•• मतदार जागृती अभियान ••
११ दिवसांची विशेष मालिका
भाग १ : जनहितार्थ मतदार जागरूकता अभियानाची गरज
वणी । दि.२१/११/२०२५ :
टीम www.WaniSamachar.com तर्फे सर्व मतदार बंधू-भगिनींना कोटी कोटी नमस्कार !
मित्रांनो, आपण रोज सकाळी चहा घेताना म्हणतो, “हे सरकार काहीच करत नाही, हे नगरसेवक फक्त आपली तुंबडी भरण्यासाठी फिरतात.” पण ज्या दिवशी आपल्या हातात खरी ताकद येते, तो म्हणजे मतदानाचा दिवस, तेव्हा आपण “उन्हाळा आहे”, “पाऊस पडतोय”, “मुलांना शाळेत सोडायचे आहे”, “दुकान उघडायचे आहे” अशी सबब सांगून घरी बसतो. म्हणजे ज्यांना आपण शिव्या देतो, त्यांनाच पुन्हा पाच वर्षांसाठी सत्ता देतो! हा अन्याय आपण स्वतःच स्वतःवर करतो.

म्हणूनच www.WaniSamachar.com च्या टीमने ठरवले आहे – यावेळी एकही मतदार घरी बसणार नाही. ११ दिवस आपण रोज एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. ही मालिका फक्त वाचायची नाही, ती शेअर करायची, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पाठवायची,वार्डा-वार्डात चर्चा करायची आणि मुख्य म्हणजे मतदानाचा दिवशी मतदान केंद्रावर पोहोचायचे आहे!
कोणत्याही अमिषाला, भुलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडा, व स्वतःचे, वार्डाचे, शहराचे भविष्य सुरक्षित करा.

टीम www.WaniSamachar.com चे पहिले आवाहन,
” यावेळी वणी शहरातील प्रत्येक वॉर्ड १००%, मतदानात अव्वल ठरला पाहिजे ! “
www.WaniSamachar.com









