“जैताई मातृत्व गौरव” पुरस्काराने सन्मानित “माधवरावजी सरपटवार” सर (वय 86) यांचे दुःखद निधन..

509

वणी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व नुकताच जैताई मातृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित माधवरावजी सरपटवार (वय ८६) यांचे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते व  प्रकृती खालावल्याने च्यांची जिवनज्योती मावळली. आपल्या ‘साधा जीवन उच्च विचार’ या विचारसरणी, सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे सरपटवार सर वणी परिसरात चिरपरिचित होते.

त्यांची अंतिम यात्रा दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या शेवाळकर परिसर, वणी येथील राहत्या घरून निघून, मोक्षधाम,वणी येथे अंत्यविधी पार पडणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंड, भावंडं असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

श्री जैताई देवस्थान, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ अशा विविध सामाजिक, साहित्यिक आणि धार्मिक क्षेत्रांत ते अग्रेसर होते. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन आणि लेखन केले होते. मितभाषी सुस्वाभावी अशी त्यांची ओळख होती. सरपटवार सर याचा निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.


Team www.WaniSamachar.com  कडून त्यांचा स्मृतिस भावपूर्ण श्रद्धासुमन !

🙏💐🙏


■□■