

वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ : भाजप चा मास्टरस्ट्रोक ! मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा भाजपा प्रवेश..
▪︎जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या हस्ते जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती.
वणी (यवतमाळ) । दि. 14/11/2025 :
भाजप ने मास्टरस्ट्रोक, वणीतील प्रभावी मनसे शहराध्यक्ष अंकुश चिंतामण बोढे यांनी भाजपा मध्ये पक्षप्रवेश केला असून, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चौहान यांनी त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्त करत, अधिकृत नियुक्तीपत्र दिले. शुक्वार (१४ नोव्हेंबर २०२५) भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश झाला.
या कार्यक्रमाला मा.ना.मदनभाऊ येरावार, मा.आ.संजिवरेड्डी बोदकुरवार,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवीजी बेलुरकर व शहराध्यक्ष अँड नीलेश चौधरी उपस्थित होते.

अंकुश बोढे हे मनसे चे वणीतील प्रमुख चेहरे होते. विशेष म्हणजे, १० नोव्हेंबरपासून उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू असतानाही एकही अर्ज दाखल न झालेल्या वणीच्या राजकीय वातावरणात भाजपाने हे ‘धक्कातंत्र’ वापरल्याचे बोलले जात आहे. बोढे यांच्या प्रवेशामुळे भाजपाला वणीत काही भागांत मजबुती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

प्रफुल्ल चौहान म्हणाले, “अंकुश बोढे यांच्यासारख्या कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश हा पक्षाच्या विस्ताराचा भाग आहे. वणीच्या विकासासाठी ते महत्त्वपूर्ण योगदान देतील.”
बोढे यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितले, “भाजपाच्या नेतृत्वाखाली आणि मोदीजींच्या मार्गदर्शनात वणीचा विकास साधता येईल, म्हणून मी हा निर्णय घेतला.”

वणी नगरपरिषदेच्या रिंगणात आता थरार अधिकच तीव्र होणार आहे. १७ नोव्हेंबरपूर्वी उमेदवार यादी आणि अर्जांची धुमश्चक्री सुरू होईल, पण बोढे यांच्या प्रवेशाने भाजपाने पहिला ‘सिक्सर’ मारला आहे!
www.WaniSamachar.com
■□■








