मा.आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत राजुभाऊ चाफले यांचा भव्य पक्ष प्रवेश..

969

प्रभाग क्रमांक १३ मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश; मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा..


वणी । दि. १४ नोव्हेंबर २०२५ :

वणी शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वाटचालीला नवी गती मिळाली. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. राजू भाऊ चाफडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. हा सोहळा वणीच्या विकासयात्रेला दिशा देणारा ठरला असून, कार्यकर्त्यांच्या उत्साह आणि एकजूटने पक्षाच्या वाढत्या जनसमर्थनाची पुष्टी झाली.

कार्यक्रमाला संबोधित करताना मान्यवरांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाला, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी कामगिरीला आणि महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाला श्रेय दिले. प्रभाग १३ मधील नागरिकांनी विकास, पारदर्शकता आणि जनसेवेच्या मार्गावर चालणाऱ्या भाजपवर दृढ विश्वास व्यक्त केला. वणीच्या प्रगतीसाठी स्थिर नेतृत्व आणि सक्षम नगरपरिषदेच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन पक्षाला बळ देण्याचे आवाहन करण्यात आले.

Click On Above Image For Details..
Click On Above Image For Details..

या भव्य प्रवेशसोहळ्यात माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवीजी बेलुरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया, भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष विजय पिदूरकर, भाजप शहराध्यक्ष अँड. नीलेश चौधरी, जिल्हा संयोजक सोशल मीडिया दीपक पाऊणकर, शहर सरचिटणीस हितेन अटारा, भाजयुमो शहराध्यक्ष बालाजी भेदोडकर, साखरकर सर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासाच्या वाटेवर वणीला पुढे नेण्यासाठी दाखवलेला उत्साह आणि एकजूट हीच भाजपची खरी ताकद असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

“विकासासाठी एकत्र – वणीसाठी सज्ज!” अशा घोषवाक्याने सोहळ्याची सांगता झाली.


www.WaniSamachar.com


■□■