वणी न.प. निवडणूक २०२५: अर्ज प्रक्रिया सुरू, पण तीन दिवसांत ‘शून्य’ अर्ज; उमेदवारांचा ‘वेट अँड वॉच’ मोड की अंतर्गत खटके?

1057

वणी नगरपरिषद निवडणूक २०२५: अर्ज प्रक्रिया सुरू, पण तीन दिवसांत ‘शून्य’ अर्ज; उमेदवारांचा ‘वेट अँड वॉच’ मोड की अंतर्गत खटके?


वणी (यवतमाळ) । १३/११/२०२५

राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून वणीतील राजकीय वातावरण तापलेले आहे.पण १० नोव्हेंबर पासून उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे सुरू झाले असले तरी काल (१२ नोव्हेंबर) तीन दिवस उलटून गेल्यानंतरही एकही अर्ज दाखल झालेला नाही. १७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असल्याने उमेदवार आणि पक्ष नेतृत्व ‘वेट अँड वॉच’ धोरण अवलंबत आहेत, की अंतर्गत खेचाटवीमुळे विलंब होत असावा, अशी चर्चा राजकीय गल्लीबोळात रंगली आहे.

वणी नगरपरिषद ही यवतमाळ जिल्ह्यातील एक महत्त्वाची राजकीय लढ्याची जागा. एकूण १४ प्रभागांमध्ये २९ नगरसेवक (प्रभाग १ ते १३ मध्ये प्रत्येकी २ सदस्य, तर प्रभाग १४ मध्ये ३ सदस्य) आणि १ नगराध्यक्ष पदासाठी रिंगण होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार:

  • १० नोव्हेंबर: अर्ज भरणे सुरू.
  • १७ नोव्हेंबर: अर्जाची अंतिम मुदत (दुपारी २ वाजेपर्यंत).
  • १८ नोव्हेंबर: अर्ज छाननी.
  • २५ नोव्हेंबर: अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत.
  • २६ नोव्हेंबर: उमेदवारांची अंतिम यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप.
  • २ डिसेंबर: मतदान.
  • ३ डिसेंबर: मतमोजणी आणि निकाल.
Double Click On Anove Image..👆

या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून प्रिंटआऊट काढावा लागेल, जो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल. मात्र, वणीतील निवडणूक निर्णय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या तीन दिवसांत शून्य अर्ज दाखल झाले आहेत.

स्थानिक राजकीय विश्लेषक म्हणतात, “वणीतील निवडणुका नेहमीच शेवटच्या क्षणात धुरळा उडवतात. पहिल्या दिवशी अर्ज घेणाऱ्यांची गर्दी असते, पण दाखल करताना विलंब होतो.”

वणीकर मतदारही उत्सुक असून, “आम्हाला विकासकामे हवीत – रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता. उमेदवार कोण असतील, हे कळले की मग ठरवू,” असे म्हणाले. वणीतील ही शांतता ‘Calm Before The Storm’ असल्याचे चित्र आहे.

१७ नोव्हेंबरपर्यंत अर्जांची संख्या वाढेल व  वणीच्या राजकीय पटावर लवकरच रंग भरतील, हे निश्चित!


 www.WaniSamachar.com


■□■