हंसराजभैया अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त वणीमध्ये भव्य लाडू वाटप; पंकजकुमार बी. भंडारी मित्र परिवार व श्री महावीर बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

1006

हंसराजभैया अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त वणीमध्ये भव्य लाडू वाटप; पंकजकुमार बी. भंडारी मित्र परिवार व श्री महावीर बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..


वणी (यवतमाळ) । 11/11/2025 :

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजभैया अहिर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने पंकजकुमार बी.भंडारी मित्र परिवारश्री महावीर बहुद्देशीय सेवाभावी संस्था, वणी यांच्या वतीने मंगळवारी (११ नोव्हेंबर २०२५) न्यू नवकार फर्निचर समोर भव्य लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय होते. यात अशोक भंडारी, पंकज भंडारी, महावीर कटारिया, राजेंद्र खिवंसरा, संदीप मदान, दीपक छाजेड, संजय बोथरा, विनोद कुचेरिया, नीलेश लोढा, प्रतीक चिंडालिया आदी मान्यवरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हंसराजभैया अहिर हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार असून, केंद्रात गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेले अहिर यांचा वाढदिवस हा विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरतो. संस्थेच्या या उपक्रमाने सामाजिक बंधुभाव वाढीस लागला असून, वणीकरांनी अहिर यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Siddh Finance VC

कार्यक्रम शांततेत व यशस्वीरीत्या पार पडला. याप्रसंगी उपस्थितांनी हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करीत पुढील सेवाकार्यात यश मिळो, अशी प्रार्थना केली.


www.WaniSamachar.com


■□■