श्री हंसराजभैया अहीर यांचा जन्मदिना निमित्त मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे भव्य आयोजन..

603

श्री हंसराजभैया अहीर यांचा जन्मदिना निमित्त मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे भव्य आयोजन

▪︎समाजसेवा हिच ईश्वरसेवा फाऊंडेशन, वणी चे स्तुत्य उपक्रम.

▪︎११ नोव्हेंबर रोजी कस्तुरबा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने.


वणी । १० नोव्हेंबर २०२५ :

समाजसेवा हिच ईश्वरसेवा फाऊंडेशन, वणीकस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येत आहे. हे शिबिरा. श्री हंसराजभैया अहीर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागसवर्गीय आयोग, भारत सरकार । पुर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री, भारत सरकार) यांचा जन्मदिन निमित्त दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत गुरुदेव सेवा मंडळ प्रार्थना मंदिर सभागृह, सावर्ला येथे होणार आहे.

शिबिराचे उद्घाटन मा. श्री. हंसराजभैय्या अहिर, अध्यक्ष – ओबीसी महासंघीय आयोग, भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. तर श्री. पवन राम एकरे, अध्यक्ष – समाजसेवा हिंद ईश्वरसेवा फाऊंडेशन, वणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी होणार आहे.


: विशेष सुचना :

आधार कार्ड , आयुष्मान भारत कार्ड सोबत आणावे.

मोफत मोती बिंदू ऑपरेशन केले जाईल तसेच नोंदणी न झालेल्या रुग्णांचीही तपासणी केली जाईल.


www.WaniSamachar.com


■□■