शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वणी नगरपालिकेसाठी इच्छुकांच्या १० नोव्हेंबरला मुलाखती; दररोज पक्षप्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य..

1216

शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वणी नगरपालिकेसाठी इच्छुकांच्या १० नोव्हेंबरला मुलाखती; दररोज पक्षप्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य..


वणी । ९ नोव्हेंबर २०२५ :

आगामी वणी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांच्या वतीने इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत विनायक मंगल कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मुलाखती जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर, जिल्हा संघटक विजय चोरडिया आणि शिवसेना नेते विनोद मोहितकर यांच्या उपस्थितीत होणार आहेत.

विजय चोरडिया यांनी सांगितले की, वणी नगरपालिका क्षेत्रातील इच्छुक कार्यकर्त्यांनी वैयक्तिक तपशील, पक्षातील कार्याचा अनुभव, स्थानिक जनसंपर्क आणि समाजकार्याचा तपशील अर्जासोबत सादर करावा. अर्ज नमुने पक्ष कार्यालयात उपलब्ध आहेत.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटन बळकटी आणि पक्षविस्तारावर भर देत विश्वास नांदेकर, विजय चोरडिया आणि विनोद मोहितकर यांच्या नेतृत्वात दररोज पक्षप्रवेश सुरू आहेत. यामुळे इच्छुकांची संख्या वाढली असून, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

शिवसेना (शिंदे) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वणीमध्ये मजबूत दावेदारी नोंदवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली असल्याचे चित्र आहे.


www.WaniSamachar.com

■□■